-
Ghee Purity Test At Home: थोडेसे तूप हाताच्या तळहातावर ठेवा. तूप शुद्ध आणि अस्सल असेल, तर शरीराच्या नैसर्गिक उष्णतेमुळे ते लगेच काही सेकंदांत वितळेल.
-
जर तूप वितळायला वेळ लागत असेल किंवा घट्टच राहत असेल, तर त्यात डालडा (वनस्पती तूप) किंवा मेणाची भेसळ असण्याची शक्यता असते.
-
एका लहान भांड्यात किंवा चमच्यात १ चमचा तूप घ्या आणि गॅसवर मंद आचेवर गरम करा. शुद्ध तूप लगेच वितळते आणि त्याचा रंग गडद तपकिरी होतो.
-
जर तूप वितळायला जास्त वेळ लागत असेल आणि त्याचा रंग पिवळसर किंवा पांढराच राहत असेल, तर ते तूप भेसळयुक्त असू शकते.
-
थोडे तूप दोन्ही हातांवर चोळा आणि काही मिनिटांनंतर त्याचा वास घ्या. शुद्ध तुपाचा मंद, छान सुगंध बराच वेळ टिकून राहतो आणि त्याचा पोत रवाळ जाणवतो.
-
याउलट भेसळयुक्त तूप हातावर चोळल्यास केवळ तेलकटपणा राहतो, पण सुगंध लगेच निघून जातो.
-
एका काचेच्या बाटलीत थोडे वितळलेले तूप आणि नारळाचे तेल समप्रमाणात एकत्र करा. ही बाटली काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. तूप आणि नारळाचे तेल वेगवेगळ्या तापमानाला गोठतात.
-
त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर जर दोन वेगळे थर दिसले, तर तुपात भेसळ आहे. जर संपूर्ण मिश्रण एकसारखेच घट्ट झाले, तर तूप १००% शुद्ध आहे.
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत