-
मराठी अभिनेत्री गायत्री दातार ही तिच्या उत्तम अभिनयशैलीमुळे घराघरांत विशेष लोकप्रिय आहे.
-
तिने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या खास ट्रिपचे सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
गायत्री दातार तिचा पती श्रीकांत चौरे याच्याबरोबर सध्या स्पेनच्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वातावरणात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
गायत्री आणि श्रीकांत यांनी स्पेनमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देत तिथल्या वातावरणात मनमुराद वेळ घालवला आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे जोडपे एकमेकांकडे प्रेमाने पाहत अतिशय आनंदात आणि रोमँटिक अंदाजात पोज देताना दिसत आहे.
-
गायत्रीने या खास व्हेकेशनसाठी डार्क ब्राऊन टॉप आणि व्हाईट-ब्राऊन कॉम्बिनेशनचा फ्लोई स्कर्ट परिधान करून अत्यंत आकर्षक लूक केला आहे.
-
दोघांच्या या स्पेन सफारीतील फोटोंवर आणि त्यांच्या भन्नाट लूकवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:गायत्री दातार/इन्स्टाग्राम)
“गौतमी पाटीललाही मागे टाकलंस भावा!” ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर पुरुषाची भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “गरिबी अनेकदा कला लपवते”