-
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ ही मालिका सध्या तिच्या रंजक कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
मालिकेतील नवनवीन वळणे आणि उत्कृष्ट कथानक यामुळे प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले आहेत.
-
या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत असून तिच्या उत्तम अभिनयाचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
-
आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने शिवानीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
अभिनयासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असलेल्या शिवानीने नुकतेच आपले काही अत्यंत आकर्षक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
स्ट्राइप्स असलेला डीपनेक शर्ट आणि त्याला मॅचिंग असा हाय-स्लिट ड्रॅप्ड स्कर्ट असा तिचा हा ग्लॅमरस लूक खूपच उठून दिसत आहे.
-
शिवानीने या फोटोंना ‘Once a Boss, always a Boss’ अशी लक्षवेधी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
पुण्यातील ३२ वर्षीय तरुण बनला ९ कोटींचा मालक! पोर्टफोलिओमध्ये कुठलाही टॉपचा फंड नाही; केवळ ७ सोपे नियम