-
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि विनोदवीर अभिनेत्री श्रेया बुगडे ही नेहमीच तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मने जिंकून घेत असते.
-
सध्या श्रेया बुगडे ही तिची व्यस्त दिनचर्या बाजूला ठेवून दुबईमध्ये पर्यटनाचा नितांत आनंद लुटताना दिसत आहे.
-
या खास ट्रिपमधील तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून त्यात ती अत्यंत आकर्षक दिसत आहे.
-
फोटोमध्ये श्रेयाने नेव्ही ब्लू आणि व्हाईट पोलका डॉटचा स्टायलिश ड्रेस परिधान केला असून त्यात तिचा लूक अतिशय क्लासिक आणि सुंदर दिसत आहे.
-
दुबई दौऱ्यादरम्यान तिने शहरातील विविध आकर्षक ठिकाणांना भेट दिली असून तेथील खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला आहे.
-
तिने या फोटोंना ‘In my favourite city …. Making less than 48 hrs count !’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
दुबईमधील तिचे हे अप्रतिम आणि सुंदर फोटो प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांनी क्लिक केले आहेत.
-
श्रेयाच्या या दुबई व्हिजिटच्या फोटोंवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय