-
Tips To Control Cholesterol Naturally: आहारामध्ये ओट्स, दलिया, कडधान्ये आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यातील फायबर वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते.
-
तूप किंवा जास्त तेलकट पदार्थांऐवजी बदाम, अक्रोड, जवस आणि ऑलिव्ह ऑईल वापरा. हे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.
-
रोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे, योगासने किंवा सायकल चालवणे यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.
-
पॅक केलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स आणि तळलेले पदार्थ यामध्ये ‘ट्रान्स फॅट्स’ असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.
-
रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खाणे किंवा आल्याचा चहा पिणे हे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
-
अतिवजनामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढते. योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने वजन आटोक्यात ठेवल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने सुधारते.
-
धूम्रपान आणि मद्यपानामुळे रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे (HDL) प्रमाण घटते आणि रक्तवाहिन्या कडक होतात, म्हणून या सवयी सोडा.
-
साध्या चहाऐवजी दररोज १-२ कप ग्रीन टी प्या. यातील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अत्यंत प्रभावी ठरतात.
माजी सरन्यायाधीश भूषण गवईंचा ‘गोकुळ’बाबतचा सल्ला डावलला का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक उत्तर