-
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर अंगदुखी आणि थकवा जाणवतो, तसेच कोणत्याही कामात उत्साह राहत नाही.
-
झोप अपूर्ण राहिल्याने मानसिक तणाव वाढतो, मूड खराब होतो आणि लहान-सहान कारणांवरून चिडचिड होते.
-
अपुऱ्या झोपेमुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावते; परिणामी कामावर एकाग्रता होत नाही आणि विसरभोळेपणा वाढतो.
-
झोपेतच शरीर स्वतःची दुरुस्ती करत असते. झोप पूर्ण न झाल्यास प्रतिकारशक्ती खालावते आणि आजारी पडण्याचा धोका वाढतो.
-
झोपेच्या अभावामुळे शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे भूक जास्त लागून वजन वेगाने वाढते.
-
अपुरी झोप घेतल्यास रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
-
पुरेशी झोप न मिळाल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात आणि त्वचा निस्तेज दिसू लागते.
-
झोप अपूर्ण राहिल्यास शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण बिघडते आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो.
माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितले, तुमच्या पोटाच्या आरोग्याचे शत्रू आहेत ‘हे’ ४ पदार्थ! लगेच बिघडवतात पचनक्रिया; आजपासूनच खाणं सोडा, अन्यथा…