-
अष्टपैलू, समृद्ध आणि नैसर्गिकरित्या गोड असणारा नारळ तिखट-आंबट करीपासून ते चविष्ट गोड पदार्थांपर्यंत जागतिक खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेला नारळ; आपल्या नैसर्गिक गोडव्याने आणि अष्टपैलू गुणधर्मांमुळे विविध पदार्थांची लज्जत वाढवतो. नारळाची जागतिक लोकप्रियता दर्शवणारे सहा चविष्ट पदार्थ.
-
ब्राझिलियन कोकोनट ब्रिगाडेरो
बेझिन्हो नावाने प्रसिद्ध असलेला हा गोड पदार्थ कंडेन्स्ड मिल्क, लोणी आणि नारळापासून बनवला जातो, ज्याचे छोटे गोळे करून त्यावर लवंग लावली जाते. -
कोकोनट त्रेस लेचेस केक
पारंपारिक त्रेस लेचेस केकला दिलेला हा एक उष्णकटिबंधीय ट्विस्ट असून यात नारळाच्या दुधाचा वापर करून केक अधिक मऊ आणि मलईदार बनवला जातो. -
गोवा कोकोनट फिश करी
भारताच्या किनारपट्टीवरील हा प्रसिद्ध पदार्थ असून, यात ताजे मासे नारळाच्या आंबट-तिखट रश्श्यात शिजवले जातात आणि वाफाळलेल्या भातासोबत वाढले जातात. -
नासी लेमाक
मलेशियाचा राष्ट्रीय पदार्थ मानला जाणारा हा भात नारळाचे दूध आणि पांडानच्या पानांमध्ये शिजवला जातो, जो सांबाल, सुके मासे, शेंगदाणे आणि अंड्यासोबत वाढला जातो. -
श्रीलंकन पोल सांबोल
खवलेला नारळ, तिखट, लिंबू आणि कांदा वापरून बनवलेली ही एक तिखट-आंबट नारळाची चटणी असून ती जेवणाची चव वाढवण्यासाठी तोंडी लावली जाते. -
थाई कोकोनट करी
नारळाचे दूध, सुगंधी मसाले आणि गवती चहा यांसारख्या वनस्पतींपासून बनवलेली ही सुगंधी करी गोड, तिखट व खारट चवींचा उत्कृष्ट मेळ साधते.
वय वाढलं तरी चालणं-उठणं राहील सोपं, गुडघेदुखीचा त्रास होणार नाही! माधुरीच्या नवऱ्याने सांगितलेले ५ सोपे उपाय करा; ‘ही’ ४ अक्षरे लक्षात ठेवा!