-
Navratri 2026: नवरीत्री म्हणजे आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा आणि नवी ऊर्जा, उत्साह घेण्याचा पवित्र सण!
-
ऑक्टोबर महिन्यात कडक ऊन आणि उकाडा असतो, त्यामुळे उपवास करताना शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
-
उपवासादरम्यान डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभरात ३-४ लिटर पाणी, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी नक्की प्या.
-
सफरचंद, डाळिंब, पपई यांसारखी रसाळ फळे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि उकाड्याचा त्रास कमी होतो.
-
उपवासाच्या आहारात ताक, दही किंवा लस्सीचा वापर करा; यामुळे पोटाला थंडवा मिळतो आणि पचनक्रिया उत्तम राहते.
-
साबुदाणा वडा किंवा जास्त तेलकट-तळलेले पदार्थ खाणे टाळा, जेणेकरून ऑक्टोबर हिटमध्ये ॲसिडिटी किंवा त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
-
खजूर, बदाम, अक्रोड आणि राजगिऱ्याचे पदार्थ खाल्ल्याने दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटेल.
-
कडक उन्हात उपवास करताना शरीराला थकवा जाणवू नये म्हणून पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
“शंकराच्या मांडीवर पार्वती विराजमान, भाजपाला हिंदुत्व कळणार नाही”, भाषणावर टीका झाल्यानंतर राहुल गांधींचं जोरदार उत्तर