-
जास्त पाणी प्यावे की नाही?
सकाळी एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळावे. कारण- त्यामुळे पोटात जडपणा, मळमळ आणि अस्वस्थता येऊ शकते, तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलनही बिघडू शकते. -
थंड की गरम पाणी?
सकाळी रिकाम्या पोटी थंड पाणी पिण्याची चूक करू नये. कारण- त्यामुळे पचनक्रिया आणि घशाशी संबंधित समस्या वाढू शकतात. -
घाईघाईने पाणी पिणे
घाईघाईने पाणी प्यायल्यास पाण्यासोबत हवाही पोटात जाते, ज्यामुळे गॅस, ढेकर किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. -
इतर चुका
पाणी प्यायल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. या दोन्ही उत्तेजक पेयांमध्ये कमीत कमी २० ते ३० मिनिटांचे अंतर ठेवावे आणि रिकाम्या पोटी नेहमी साधे पाणीच प्यावे. -
रिकाम्या पोटी पाणी पिण्याची योग्य पद्धत
सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास साधे किंवा हलके कोमट पाणी एकाच वेळी न गटकता, हळूहळू घोट-घोट पिणे फायदेशीर ठरते, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहून ते योग्य प्रकारे शोषले जाते. -
फायदे
सकाळी योग्य पद्धतीने पाणी प्यायल्यास रात्रभराचा डिहायड्रेशनचा त्रास दूर होतो आणि पचनसंस्था सक्रिय होण्यास मदत होते. -
अतिरिक्त लाभ
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते, तसेच दिवसभर शरीरात ऊर्जा आणि ताजेतवानेपणा टिकून राहतो.
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव