-
भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहला भेट दिली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत. (सर्व फोटो: एएनआय)
-
निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची मोदींनी भेट घेतली आहे. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून नक्की या परिसामध्ये कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिली.
-
निमू येथे तैनात असणाऱ्या लष्कराच्या जवनांबरोबरच हवाई दलाचे अधिकारी आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या जवानांशीही मोदींनी संवाद साधला.
-
भारत चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. याच पार्श्वभूमीवर मोदींनी ही आढावा घेणारा दौरा केला आहे.
-
मोदींनी येथील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील माहिती घेण्याबरोबरच सैनिकांचे मनोबलही वाढवलं.
-
मोदींनी या भागातील लष्करी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी तोंडावर मास्क लावलेलं.
-
मोदींबरोबरच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही मास्क लावल्याचं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळल्याचं दिसून आलं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत.
-
“भारतानं कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केलं आहे. आपलं आयुष्य वेचलं आहे. संपूर्ण जगानं आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचं युग संपलं असून, जग विकासाकडे वाटचाल करत आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला.

१९ मार्च पंचांग : रंगपंचमीचा सण कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? तुमच्या आयुष्यात कसा येणार आनंद? वाचा राशिभविष्य