७० वा वाढदिवस ७० कार्यक्रम; मोदींच्या वाढदिवसाचा भाजपाचा ‘मास्टर प्लॅन’
- 1 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढील महिन्यात ७० वा वाढदिवस आहे. १७ सप्टेंबर रोजी असणारा मोदींचा हा ७० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे. (सर्व फोटो हे फाइल फोटो आहेत.)
- 2 / 11
या वर्षी मोदींचा वाढदिवस हा 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
- 3 / 11
मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाहीय. लोकांनी गर्दी करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- 4 / 11
यंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे. याचबरोबर रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ७० ठीकाणी ७० कार्यक्रम करण्याचा भाजपाचा विचार आहे.
- 5 / 11
मोदींचा वाढदिवस साजरा करताना कोणत्याही प्रकारे करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही याबद्दल विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
- 6 / 11
मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये करोनाचे नियम पाळले जावेत यासंदर्भातील सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असं कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आहे.
- 7 / 11
मागील वर्षी पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस पक्षाच्या माध्यमातून एक आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला होता.
- 8 / 11
काही दिवसांपूर्वीच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पक्षाच्या महासचिवांची बैठक झाली. त्या बैठकीमध्येच पंतप्रधान मोदींच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे कार्यक्रम बूथ आणि कार्यकर्ता स्तरावर पार पडतील.
- 9 / 11
मागील एका वर्षामध्ये भाजपा सरकारने काय काम केलं आहे याबद्दलची माहिती पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जनतेपर्यंत पोहचवण्याचा भाजपाचा विचार आहे.
- 10 / 11
करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये केंद्र सरकारने काय निर्णय घेतले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत योजना नक्की काय आहे याबद्दलची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचवली जाणार आहे.
- 11 / 11
यंदा भाजपा गांधी जयंतीबरोबरच २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांची जयंतीही साजरी करणार आहे. या कार्यक्रमांमध्येही करोनासंदर्भातील नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.