३० सेकंदात नष्ट होणार करोना विषाणू; संशोधकांनी लावला ‘प्लाझ्मा जेट’चा शोध
- 1 / 10
सध्या जगभरामध्ये दहशत असणाऱ्या करोना विषाणूवर लस शोधण्यासाठी वेगवगेळ्या देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. करोनावर औषध आणि लस शोधण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयोग आणि चाचण्या सुरु आहेत. (सर्व फोटो एपीच्या सौजन्याने)
- 2 / 10
एकीकडे हे संशोधन सुरु असतानाच दुसरीकडे वैज्ञानिकांनी करोनाचा विषाणू नष्ट करण्याची क्षमता प्लाझ्मा जेटमध्ये असल्याचा दावा केला आहे. प्लाझ्मा जेटच्या मदतीने अवघ्या ३० सेकंदांमध्ये करोनाचा विषाणूचा खात्मा करता येतो असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
- 3 / 10
अमेरिकेतील लॉस एन्जलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलेल्या संशोधनामध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने धातू, चामडे आणि प्लास्टिकवर असणारा करोना विषाणू अवघ्या ३० सेकंदांमध्ये नष्ट करता येतो.
- 4 / 10
संशोधकांनी थ्री-डी प्रिंटरच्या मदतीने हा प्लाझ्मा जेट तयार केला आहे. या प्लाझ्मा जेटची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.
- 5 / 10
संशोधनामध्ये प्लाझ्मा जेटचा स्प्रे प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड आणि चामड्यावर मारण्यात आला. यामध्ये करोनाचा विषाणू हा तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये नष्ट करण्यात यश आल्याचे दिसून आलं. बहुतांश विषाणू हे ३० सेकंदांमध्ये नष्ट झाले.
- 6 / 10
फिजिक्स ऑफ फ्लुएड्स नावाच्या जर्नलमध्ये यासंदर्भात संशोधनाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
- 7 / 10
प्लाझ्मा जेट हा पदार्थांच्या चार मूळ अवस्थांपैकी एक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्थिर गॅसला गरम करुन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डच्या संपर्कात आणून प्लाझ्मा जेट तयार करता येतो.
- 8 / 10
प्लाझ्मा जेट स्प्रे हा फेस मास्कवरही वापरता येईल. इतर गोष्टींप्रमाणे हे मास्कवरही परिणामकारक ठरेल.
- 9 / 10
करोनाचा विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागांवर अनेक तास राहू शकतो असं या पूर्वीच्या अनेक संशोधनांमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे प्लाझ्मा जेटच्या मदतीने वस्तूंच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग थांबवण्यास मदत होईल असा विश्वास संशोधकांना आहे.
- 10 / 10
प्लाझ्मा जेट ही पद्धत केवळ वस्तूंच्या माध्यमातून करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी वापरता येणार आहे. त्यामुळेच लस आणि प्लाज्मा जेट या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. प्लाझ्मा जेट हे केवळ निर्जीव वस्तूंवर वापरण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)