शपथ, फेटा आणि अमोल कोल्हे…..धनंजय मुडेंनी सांगितला जिवलग मित्राचा ‘तो’ किस्सा
- 1 / 8
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. (सर्व फोटो - संग्रहित)
- 2 / 8
यावेळी धनजंय मुंडेंनी अमोल कोल्हेंनी घेतलेली ती शपथ आणि आपल्याला अभिमान वाटलेल्या त्या क्षणाची आठवण सांगितली.
- 3 / 8
‘जेव्हा परळीकर धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन,’ असा प्रण अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शिवस्वराज्य यात्रेत केला होता.
- 4 / 8
धनंजय मुंडे यांनी ती आठवण सांगत म्हटलं की, "विधासभेच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे हे परळी येथे माझ्या प्रचारसभेसाठी आले होते. तेव्हा, त्यांनी प्रण केला होता की, धनंजय मुंडे निवडून आले तरच आयुष्यात फेटा घालेन, अन्यथा फेटा बांधणार नाही".
- 5 / 8
विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंचा विजय झाला आणि अमोल कोल्हे यांनी चार महिन्यांनंतर फेटा बांधला होता.
- 6 / 8
‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या निमित्ताने हा प्रण पूर्ण झाल्याचं सांगताना धनजंय मुंडे यांनी अभिमान व्यक्त केला.
- 7 / 8
"मी, निवडून आलो. माझं भाग्य बघा, कोल्हे साहेबांचा छत्रपती शंभूराजे हा कार्यक्रम सुरू होता आणि मला फेटा बांधायची वेळ आली. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शंभूराजे यांच्या वेशभूषेत होते," असं त्यांनी सांगितलं.
- 8 / 8
"त्यावेळी म्हणालो होतो. एखाद्या मावळ्याला छत्रपती संभाजीराजे यांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्यानंतर जो आनंद होत असेल तोच आनंद आज २१ व्या शतकात छत्रपतींच्या वेशभूषेत असलेल्या माझ्या जिवलग मित्राचा सत्कार करताना मावळा म्हणून मला झाला," अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.