-
भारतामध्ये पेट्रोल आणि डीझेलचे दर विक्रमी स्तरावर पोहचले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ९० रुपयांच्या पलिकडे गेले आहेत तर मुंबईमध्येही पेट्रोलने ९५ चा आकडा ओलांडला आहे.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
एकीकडे भारतामध्ये इंधन दरवाढ होत असतानाच भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल डीझेल भारतापेक्षा अर्ध्या किंमतीत विकलं जात आहे.
-
पाकिस्तानमध्ये पेट्रोल ५१ रुपये लीटरच्या आसपास आहे तर चीनमध्ये ७४.७४ रुपये लीटर पेट्रोल मिळत आहे. एका देशात तर चक्क १ रुपया ४५ पैसे दराने एक लीटर पेट्रोल मिळत आहेत. जगात कुठे आणि किती दराने पेट्रोल मिळत आहे हे जाणून घेऊयात.
-
भारताच्या शेजरी देशांबद्दल बोलायचं झाल्यास पाकिस्तानमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी ५१.१४ रुपये मोजावे लागत आहेत.
-
भारताचा दक्षिणेकडील शेजरी देश असणाऱ्या श्रीलंकेमध्ये प्रती लीटर पेट्रोल हे ६०.२६ रुपयांना उपलब्ध आहे.
-
बांगलादेशमध्ये पेट्रोलचा दर ७६.४१ रुपये प्रती लीटर इतका आहे.
-
नेपाळ या छोट्या आकाराच्या देशामध्ये पेट्रोल ६८.९८ रुपये लीटर दराने मिळते.
-
भूतानमध्ये पेट्रोलचे दर ४९.५६ रुपये लीटर इतके आहेत.
-
जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये मिळते. येथे एक लीटर पेट्रोलसाठी तब्बल १७४.३८ रुपये मोजावे लागतात.
-
सर्वात महागडं पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक दुसऱ्या स्थानी असून येते पेट्रोल १४८.०८ रुपये प्रती लीटर दराने पेट्रोल मिळते.
-
नेदरलॅण्डमध्येही पेट्रोल महाग आहे. येथे एक लीटर पेट्रोल १४७.३८ रुपयांना आहे.
-
१४३.४१ रुपये दराने नॉर्वेमध्ये एक लीटर पेट्रोल मिळते.
-
ग्रीसमध्येही पेट्रोलसाठी १३५.६१ रुपये प्रती लीटर एवढा दर मोजावा लागतो.
-
जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये कुवैत पाचव्या क्रमांकावर आहे. कुवैतमध्ये एक लीटर पेट्रोल २५.२६ रुपयांना मिळते.
-
अल्जेरियामध्येही एक लीटर पेट्रोलसाठी जवळजवळ २५ रुपयेच मोजावे लागतात. येथे पेट्रोलचा दर प्रती लीटर २५.१५ रुपये इतका आहे.
-
अंगोला देशामध्ये तर प्रती लीटर पेट्रोलसाठी २० रुपयांहून कमी पैसे मोजावे लागतात. येथे १७.८२ रुपयांना एक लीटर पेट्रोल मिळतं.
-
इराणमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी पाच रुपयांहूनही कमी पैसे मोजावे लागतात असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे. इराणमध्ये पेट्रोलचा दर प्रती लीटर साडेचार रुपये इतका आहे.
-
जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये मिळतं. येथे एका लीटर पेट्रोलसाठी केवळ १ रुपये ४५ पैसे मोजावे लागतात.
-
भारतामध्ये फेब्रुवारी महिन्यात तब्बल ११ वेळा पेट्रोल डीझेलचे भाव वाढले आहेत. जानेवारीमध्ये १० वेळा इंधनदरवाढ झाली होती. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि पीटीआय)

“मी ट्रेनमधील पंख्याला पकडून…”, रेल्वे अपघातातून बचावलेल्या प्रवाशाचा थरारक अनुभव; म्हणाला, “सीटखाली दोन वर्षांचा मुलगा…”