
बरोबर १३ वर्षांपूर्वी १० दहशतवाद्यांनी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला केला. सलग ३ दिवस सुरू असलेल्या हल्ल्यांनी मुंबई अक्षरशः थांबली.
२००८ च्या या दहशतवादी हल्ल्यात परदेशी नागरिकांसह एकूण १६६ नागरिकांनी जीव गमावला. (Express photo by Prashant Nadkar)
ताजमहाल पॅलेस हॉटेल आगीत जळत असतानाचं दृष्य तर मुंबईकरांच्या मनात अगदी कोरलं गेलं आणि त्याने या हल्ल्याची भीषणता कायम करून दिलीय. (Express photo by Vasant Prabhu)
पोलीस दल आणि सुरक्षा दलाने तात्काळ कारवाई केल्यानंतरही तब्बल ६० तास ४ शस्त्रास्त्रांचा मोठा साठा असलेल्या दहशतवाद्यांनी अक्षरशः मुंबईला वेठीस धरलं.
कुलाबातील कॅफे लिओपोल्डवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू तर २८ जण जखमी झाले होते. (Express Photo by Vasant Prabhu)
दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबाराचे निशाण या ठिकाणी काचांवर पाहायला मिळाले. (Express Photo by Pradip Das)
मुंबईतील सीएसटी येथे दहशतवादी हल्ल्यानंतर काचांचा खच पडलेला पाहायला मिळाला. हल्ल्यानंतर या ठिकाणची साफसफाई करतानाचा हा फोटो. (Express photo: Pradeep Kocharekar)
मुंबईतील कामा हॉस्पिटलजवळच दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहताना नागरिक. (Express photo : Prashant Nadkar)
हा फोटो मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर बरोबर १ महिन्याने नरिमन हाऊस येथे काढण्यात आला. यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या खुणा स्पष्टपणे पाहता येतात.
नोव्हेंबर २००८ मध्ये जेव्हा ताजमहाल हॉटेलचे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली तेव्हा सुरक्षित ठिकाणी जाताना जवान. (AP)