
शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह आज पार पडत आहे.
राऊत यांच्या मुलीच्या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावल्याचं पहायला मिळालं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या लग्नाला उपस्थित होते.
राज ठाकरे आणि राऊत कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध आहेत.
राजकीय मतभेद असतली तरी खासगी आयुष्यामध्ये ठाकरे आणि राऊत कुटुंबीयांचे फार घनिष्ठ संबंध आहेत.
याचीच प्रचिती आज संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त पुन्हा आली.
राज ठाकरे हे त्यांच्या पत्नीसोबत लग्नाला हजर होते.
राज ठाकरे हे त्यांच्या पत्नीसोबत लग्नाला हजर होते.
राज यांना पाहताच अनेकांना त्यांच्यासोबत फोटो, सेल्फी काढण्याचा मोह आवरत नसल्याचं चित्र पहायला मिळालं.
अनेक मान्यवरांनी राज यांच्यासोबत फोटो काढून घेतले.
राज यांच्याभोवती सुरक्षारक्षकांचं मोठं कडं होतं.
सुरक्षारक्षकांच्या मदतीनेच ते गर्दी टाळण्याचा प्रयत्न करत मंचावर पोहचले.
राज यांनी आधी वधू-वराला शुभेच्छा दिल्या.
नंतर राज यांनी राऊत यांचेही अभिनंदन केले.
राज ठाकरे आणि वधू पिता असणारे संजय राऊत बराच वेळ मंचावरच गंप्पा मारत होते.
राऊत राज यांना काहीतरी सांगताना दिसले.
त्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नीने नव वधू-वरासोबत फोटो काढून घेतला.
यावेळेस राज यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मनसेचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.
संजय राऊत हे सपत्नीक राज यांच्या नव्या घरी ‘शिवतीर्थ’ला भेटीसाठी गेले होते. सुमारे अर्धा तास ही भेट झाली. मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत राज यांच्या घरी गेले होते. सध्या राज आणि राऊत यांच्या राजकीय विचारसणीमध्ये फरक असला तरी ते चांगले मित्र आहेत.
लग्नाचं आमंत्रण देऊन राऊत राज यांच्या घराबाहेर पडले तेव्हा राज आणि शर्मिला ठाकरे हे त्यांना अगदी गाडीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.
राज ठाकरेंबरोबरच इतर मान्यवरही या लग्नाला उपस्थित होते. यामध्ये अगदी पालिका स्तरावरील महत्वाच्या पदावरील व्यक्तींपासून राष्ट्रीय राजकारणात दबदबा असणाऱ्या नेत्यांचाही समावेश होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही लग्नाला उपस्थित होते.
राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही लग्नाला उपस्थित होते.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही लग्नाला उपस्थित होत्या.
या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. राऊत यांनी पवार कुटुंबियांना अगदी घरी जाऊन लग्नाचं आमंत्रण दिलं होतं.
शरद पवार हे त्यांच्या पत्नीसहीत लग्नाला हजर होते.
लग्न लागण्याच्या मुहूर्तावरच शरद पवार हॉलवर पोहचले.
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही या लग्नाला उपस्थित असणाऱ्या बड्या नेत्यांपैकी एक होते.