
आज देशभरात मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय.
परंतू राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांवर भीक मागो आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्याचंं आंदोलन सुरू आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यातच आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलंय.
पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी कर्मचारी प्रजासत्ताक दिनी भीक मागो आंदोलन करत आहेत.
वाहक आणि चालक यांनी पिंपरीतील नाशिक फाटा येथे सिग्नवर भीक मागो आंदोलन केले आहे.
भीक मागितलेल्या पैशांमधून ते ढोल विकत घेणार आहोत.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागण्या मान्य करण्याचं साकडं घालणार आहोत, अस एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
हातात फलक घेत रस्त्यावर उभे राहून हे एसटी कर्मचारी ये-जा करणाऱ्या लोकांकडून भीक मागत आहेत.
दरम्यान, फक्त पिंपरी-चिंचवडमध्येच नाही, तर जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात देखील एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य भीक मांगो आंदोलन सुरू आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या ८० दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे.
परंतु अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.
एसटी कर्मचाऱ्यांना त्यांना देण्यासाठी आर्थिक बजेट नसल्याने चोपडा येथील एसटी कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारीचं औचित्य साधत भीक मागो आंदोलन केलं.
प्रजासत्ताक दिवशी एसटी आगारात भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आगारात सर्व कर्मचाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केले आहे.
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा न निघाल्याने आज कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलं.
८० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेणारे हेच का महाराष्ट्रातील प्रगतशील सरकार, अशा आशयाचं फलक घेत कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.
(फोटो सौजन्य – कृष्णा पांचाळ पिंपरी चिंचवड)