
आयएएस अधिकारी टीन डाबी आणि प्रपीद गावंडे अखेर विवाबंधनात अडकले आहेत.

जयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. याच ठिकाणी रिसेप्शनदेखील देण्यात आलं.

लग्नानंतर टीना डाबी यांनी ट्विटरवरील आपला प्रोफाइल फोटो बदलला आहे.

फोटोमध्ये टीना डाबी पती प्रदीप गावंडे यांच्यासोबत दिसत आहेत. #NewProfilePic असा हॅशटॅग देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं.

दोघांच्या लग्नातील एक फोटो समोर आला आहे. या फोटोत दोघेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून लग्नविधी करत असल्याचं दिसत आहे.

हे लग्न बौद्ध पद्धतीनुसार पार पडल्याची माहिती आहे.

टीना आणि प्रदीप यांच्या लग्नात नातेवाईक आणि जवळचे लोक उपस्थित होते.

२० ते २२ एप्रिलपर्यंत जयपूरमध्ये लग्नाचे कार्यक्रम सुरु होते.

लग्नानंतर जयपूरच्या हॉटेलमध्ये रिसेप्शन देण्यात आलं.

टीना डाबी यांनी सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर केले आहेत.

टीना डाबी २०१६ राजस्थान कॅडरच्या अधिकारी असून त्यांनी लग्न करत असल्याची घोषणा केल्यापासून सर्वांना त्यांचे होणारे पती कोण आहेत याचं कुतुहूल होतं.

प्रदीप गावंडे राजस्थान केडरचे २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामवर प्रदीप गावंडे यांच्यासोबत फोटो शेअर करत लग्न करत असल्याचा खुलासा केला होता.

टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामला साखरपुड्याचा फोटो शेअर करताना लिहिलं होतं की, “तू दिलेलं हास्य मी परिधान करत आहे”.

प्रदीप गावंडे यांनीदेखील इन्स्टाग्रामला टीना डाबी यांच्यासोबतचे फोटो शेअर केले होते.

प्रदीप गावंडे मूळचे लातूरचे असून त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला आहे.

प्रदीप गावंडे यांच्या वडिलांचं नाव केशवराव गावंडे असून आईचं नाव सत्यभामा गावंडे आहे.

सध्या त्यांचं कुटुंब पुण्यात वास्तव्याला आहे.

उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबातून असणाऱ्या प्रदीप गावंडे यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये मराठी असा उल्लेख केला आहे.

प्रदीप यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली आणि नंतर यूपीएससी उत्तीर्ण केली.

प्रदीप गावंडे सध्या जयपूरमध्ये तैनात आहेत. तर टीना दाबी या देखील जयपूरमध्येच कार्यरत आहेत.

ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.

सोशल मीडिया प्रोफाईलवरील माहितीनुसार, प्रदीप गावंडे हे सध्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय राजस्थान येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

प्रदीप गावंडे हे टीना दाबी यांच्यापेक्षा तीन वर्षांनी सिनिअर आहेत. तसंच दोघांच्या वयातही जवळपास १३ वर्षांचं अंतर आहे.

टीना डाबी यांचं हे दुसरं लग्न असून प्रदीप गावंडे यांचे हे पहिलं ल्गन आहे.

टीना डाबी मूळच्या दिल्लीच्या आहेत.

महत्वाचं म्हणजे फक्त पतीच नाही तर टीना डाबी यांची आईदेखील मराठी आहे.

टीना यांची आई हिमानी दाबी महाराष्ट्रातील कांबळे कुटुंबातून आहेत.

त्यांचे आजोबा माधवराव कांबळे हे स्टेशन मास्तर होते.

टीना डाबी यांचं कुटुंब बाबासाहेब आंबेडकरांसोबत अनेक लढ्यातही सामील झालं होतं.

टीना डाबी यांचं हे दुसरं लग्न आहे.

२०१८ चे आयएएस अतहर खान यांच्यासोबत त्यांचं पहिलं लग्न झालं होतं.

अतहर खान २०१६ च्या युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर होते.

ट्रेनिंगदरम्यान टीना आणि अतहरमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

एका मुलाखतीत टीना यांनी पहिल्या नजरेत आपल्याला अतहरसोबत प्रेम झालं होतं अशी कबुली दिली होती.

धर्माच्या भिंती तोडून २०१८ मध्ये झालेल्या त्यांच्या या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती.

अनेक हिंदू संघटनांनी या लग्नाला विरोध केला होता. काही लोकांनी याला लव्ह जिहादही म्हटलं होतं. पण टीना यांना याकडे दुर्लक्ष केलं होतं.

लग्नानंतर अतहर खान राजस्थानमध्ये कार्यरत होते.

दोन वर्षांनी २०२० मध्ये त्यांनी सहमतीने तलाक घेतला होता.

पण तलाक झाल्यानंतर अतहर खान यांनी जम्मू काश्मीर कॅडर घेतलं आणि आपल्या राज्यात गेले.

साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर टीना डाबी यांनी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

यानंतर त्यांनी आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांचे कोणतेही फोटो समोर आले नव्हते.

पण अखेर सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर केले आहेत.