
ग्राम सुरक्षा योजना ही पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजनांपैकी एक आहे. जर तुम्हाला कमी गुंतवणूक करायची असेल आणि जास्त नफा मिळवायचा असेल, तर या योजनेचा लाभ घ्या.

या योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती दरमहा १४११ रुपये गुंतवू शकते आणि सुमारे ३५ लाख रुपये मिळवू शकतात.

छोट्या गुंतवणुकीवर दरमहा लाखो रुपयांचा निधी जमा करता येतो.

विविध वैशिष्ट्यासह ही संपूर्ण जीवन विमा पॉलिसी आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही कर्जही घेऊ शकता. मात्र, योजनेत ४ वर्षे गुंतवणूक केल्यानंतरच ते उपलब्ध होईल.

या योजनेसाठी किमान १५ आणि कमाल ५५ वर्षाची अट आहे. या योजनेत तुम्ही १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

या योजनेतील प्रीमियम दरमहा, त्रैमासिक, सहा महिने आणि वार्षिक आधारावर भरता येतो.

वयाच्या १९ वर्षापासून गुंतवणुकदाराला ५५ वर्षे वयापर्यंत १० लाख रुपये गुंतवायचे असतील, तर त्याला दरमहा १५१५ रुपये प्रीमियम भरावा लागेल.

वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत गुंतवणुकीसाठी दरमहा १४६३ रुपये जमा करावे लागतील .

वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला १४११ रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागतील.

आपत्कालीन परिस्थितीत ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी अनुमत आहे.

गुंतवणुकीच्या दिवसापासून, पॉलिसी ३ वर्षांनी तोडली जाऊ शकते.