
स्पेन देशात महिलांना मासिक पाळीत रजा देण्याचा नवा नियम लागू होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर, कामाच्या ठिकाणी मासिक पाळीची रजा देणारा स्पेन हा पहिला पाश्चात्य देश बनणार आहे.

महिलांना मासिक पाळीत तीव्र वेदना होत असल्यास, दर महिन्याला तीन दिवस कामावरून सुट्टी देणारे स्पेन हे पहिले युरोपीय राष्ट्र बनू शकते.

जपान, दक्षिण कोरिया, आणि इंडोनेशिया आणि झांबिया यांसारखे काही मोजकेच देश राष्ट्रीय स्तरावर मासिक पाळीसाठी
सुट्टी देतात.

युनायटेड स्टेट्समध्ये, काही कंपन्या मासिक पाळी सुट्टी देतात. भारतातही काही कंपन्या मासिक पाळीच्या सुट्या देतात.

मासिक पाळीबद्दल अनेक विरोधाभासी मते आहेत, अगदी स्त्रियांकडूनही. काही स्त्रिया म्हणतात की हे आवश्यक आहे, तर इतरांनी असे म्हटले आहे की यामुळे कामाच्या ठिकाणी आणखी भेदभाव होईल.

गेल्या वर्षी जुलैमध्ये, उत्तर प्रदेशातील महिला शिक्षकांच्या संघटनेने महिला शिक्षकांना पाळीच्या कालावधीत तीन दिवसांची मिळावी यासाठी मोहीम सुरू केली होती.

स्पॅनिश स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र सोसायटी म्हणते, सुमारे एक तृतीयांश महिलांना त्यांच्या मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होतात. याला डिसमेनोरिया म्हणतात.

डिसमेनोरियाच्या लक्षणांमध्ये तीव्र ओटीपोटात दुखणे, डोकेदुखी, अतिसार आणि ताप यांचा समावेश होतो. अनेक महिलांना मासिक पाळी येण्यापूर्वीही वेदना होतात.

स्पेनमधील शाळा ज्या मुलींना गरज आहे त्यांना सॅनिटरी पॅड पुरवतील.

समाजातील उपेक्षित वर्गातील महिलांना सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्स मोफत दिले जाणार आहेत.

सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पन्सच्या विक्रीच्या किमतीतून व्हॅट काढून टाकण्याची मागणी स्पॅनिश महिलांनी केली होती.