
जगातील सर्वात लांब बांधकाम असलेला पादचारी झुलता पूल नुकताच सर्वांसाठी खुला करण्यात आला. झेक प्रजासत्ताकमधील जगातील सर्वात लांब झुलत्या पुलाचे काही अद्भुत फोटो पाहूया:

हा पूल ७२१-मीटर (२,३६५-फूट) -लांब असून समुद्रसपाटीपासून १,१०० मीटर (३,६१० फूट) पेक्षा जास्त उंचीवर बांधला गेला आहे.

हा पूल पर्वतांच्या दोन कड्यांना जोडण्यात आलेला आहे. आणि खाली असलेल्या दरीच्या 95 मीटरवर (312 फूट) लटकवण्यात आलेला आहे.

स्काय ब्रिज देशाच्या ईशान्य भागात, प्रागच्या पूर्वेस सुमारे 200 किलोमीटर (125 मैल) पोलंडच्या सीमेजवळ क्रॅलिकी स्नेझनिक पर्वत रांगेत स्थित आहे.

ज्यांना उंचीवरून डोकवायला अवडते त्यांच्यासाठी हा पूल योग्य आहेे.

135 किमी प्रतितास (84 mph) वेगाने वारे वाहल्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल बंद करण्यात येणार आहे.

दिवसभरात 500 पर्यंत लोकांना वेळी पुलावर येण्याची परवानगी आहे. शुक्रवारी हा पूल सगळ्यांसाठी खुला झाल्यानंतर अनेक लोकांनी गर्दी केली होती.

या पूलाच्या बांधकामाला दोन वर्षे लागली आणि सुमारे 200 दशलक्ष रुपये (USD8.3 दशलक्ष) खर्च झाले.

झेक टुरिझमचा विश्वास आहे, की हा पूल जगभरातील पर्यटकांना आकर्षित करू शकेल.