
नलबारी जिल्ह्यातील कमरकुची गावातील पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी जात असताना एक व्यक्ती आपल्या प्राण्यांना एका टबमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. (पीटीआय फोटो)

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अहवालानुसार ५ हजारहून अधिक गावांमध्ये ४७,७२,१४० लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील विविध भागात २ लाखांहून अधिक लोक मदत छावण्यांमध्ये आहेत. छायाचित्रात. आसाममधील नलबारी जिल्ह्यातील पूरग्रस्त गावात सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लोक केळीचा तराफा वापरताना दिसत आहेत, (पीटीआय फोटो)

नागाव जिल्ह्यात रविवार, १९ जून २०२२ रोजी अतिवृष्टीनंतर पूरग्रस्त भागातून ग्रामस्थ त्यांच्या सामानासह सुरक्षित स्थळी जात आहेत.

रविवारी, १९ जून २०२२ रोजी, मोरीगाव जिल्ह्यात, अतिवृष्टीनंतर पूरग्रस्त भागातून कंटेनरमध्ये पिण्याचे पाणी नेणारी एक महिला. (पीटीआय फोटो)

सिलचरमधील पूरग्रस्त भागातून लोक आपल्या कुटुंबाला घेऊन सुरक्षित स्थळी जात असताना (पीटीआय फोटो)

आसाममधील नागाव जिल्ह्यात रविवार, १९ जून २०२२ रोजी पूर आलेला रस्ता ओलांडण्यासाठी गावकरी केळीचा तराफा वापरतात. (पीटीआय फोटो)

बक्सा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त धमधामा-खाटीकुची जोड रस्त्याची पाहणी करताना स्थानिक

गुवाहाटीतील चंदनगिरी येथे मुसळधार पावसामुळे गुवाहाटी महानगरपालिकेच्या कार्यालयाची सीमा भिंत कोसळली.

भारतीय लष्कराच्या जवानांनी कामरूप जिल्ह्यातील कलिता कुची येथील पूरग्रस्त भागातून गावकऱ्यांची सुटका केली.

सिलचरमधील पूरग्रस्त भागातून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना सुरक्षा स्थळी हलवले.

कामरूप जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून प्रवासी मार्ग काढताना. (PTI फोटो)

नागाव जिल्ह्यातील राहा गावात पूरग्रस्त ठिकाणी ये-जा करण्यासाठी गावकरी बोटीचा वापर करत आहेत.

नागाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त झालेल्या रस्त्याची पाहणी करताना स्थानिक

सिलचरमध्ये संततधार पाऊस सुरुच आहे. भर रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यातून नागरीकांना मार्ग काढावा लागत आहे.

आसाममधील कामरूप जिल्ह्यात एक मोटारसायकलस्वार पूरग्रस्त रस्त्यावरून जात आहे.