-

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे.
-
जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
-
मध्य प्रदेशातील धार येथे नर्मदा नदीवरील पूलावर हा अपघात झाला आहे.
-
तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली.
-
अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे.
-
बसचा छताकडील भाग पाण्यात तर चाकं वर अशा अवस्थेत अपघातग्रस्त बस पूलावरुन दिसत होती. यावरुनच अपघाताची दाहकतेचा अंदाज बांधता येतो.
-
अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची (एमएच ४० – एन ९८४८ ) होती.
-
बस सकाळी ७.३० वाजता धार येथून अंमळनेरकडे निघाली होती. तेव्हाच प्रवासादरम्यान नर्मदा नदीवरील पूलावर हा अपघात घडला.
-
खलघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली.
-
दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
-
या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
-
“आम्ही दुर्घटनेची सविस्तर माहिती घेत आहोत. महाराष्ट्रातील किती प्रवासी होते याची माहिती मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. १३ मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे,” असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं.
-
अपघातग्रस्त बसच्या फोटोंबरोबरच अपघात झालेल्या ठिकाणाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
“ही बस अंमळनेरकडे निघाली होती. महाराष्ट्राचे एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. जळगाव, धुळेमधून अधिकारी पोहोचल्यानंतर अधिक माहिती मिळेल,” असंही चन्ने यांनी सांगितलं.
-
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणे सुरू आहे, असं जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं आहे.
-
बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवरुन सांगितलं आहे. अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे.
-
१५ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
-
खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्या खलघाट गावाजवळ नर्मदा नदीपात्रात बस कोसळली. यात सुमारे पन्नास ते साठ प्रवासी असून, यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सात पुरुष आणि चार महिलांचे मृतदेह सापडले आहेत.
-
बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील (क्रमांक १८६०३) व वाहक प्रकाश श्रावण चौधरी (क्रमाक ८७५५) हे होते; परंतु त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही.
-
क्रेनच्या सहाय्याने ही बस नदीपात्रामधून वर काढण्यात आलीय.
-
अपघातग्रस्त बसच्या सांगाड्यावरुनच अपघाताची दाहकता लक्षात येते.
Photos: तुटलेला कठडा, नदीपात्रात उलटी पडलेली एसटी बस अन्…; मध्य प्रदेशातील अपघाताचे हे २१ फोटो पाहून अंगावर येईल काटा
जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू
Web Title: Many dead as maharashtra roadways bus falls off bridge in mp dhar scsg