-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (३० ऑगस्ट) कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो लाइन-३ च्या प्रोटोटाईप ट्रेन चाचणी शुभारंभ कार्यक्रमात जोरदार राजकीय टोलेबाजी केली.
-
यात फडणवीसांची इच्छाशक्ती, अश्विनी भिडेंची नियुक्ती ते कमी चेंडूत जास्त धावा अशा अनेक वक्तव्यांचा समावेश आहे. अशाच १० विधानांचं आढावा.
-
१. विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
२. प्रदुषण कमी होईल, साडेसहा लाख वाहनांची संख्या कमी होईल, १७ लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील, वेळ वाचेल, साडेतीन लाख लिटर इंधन वापर कमी होईल आणि राजकीय प्रदुषणही कमी होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिं
-
३. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, मेट्रोच्या कामावरील स्थगिती उठवली पाहिजे. त्यामुळे आम्ही दीर्घकाळ प्रलंबित हा प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
४. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक कामं सुरू झाली. तसेच पाच वर्षात या प्रकल्पांनी मोठी प्रगती केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
५. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा प्रकल्प पुढे न्यायचा असं मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला. अनेकांनी अडथळे आणले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
६. समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या महाराष्ट्रातील भागाला होणार आहे. देवेंद्र फडणवीसांकडे इच्छाशक्ती होती आणि मग मी त्याप्रमाणे काम केलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
७. अश्विनी भिडे मुंबई मेट्रोचं काम पाहत आहेत. त्या सुरुवातीपासून इकडे आहेत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिली ऑर्डर त्यांची काढली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
८. एखादा प्रकल्प सुरू आहे आणि चाललंय, चाललंय, सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आम्हाला काहीही करायचं नाही. आम्हाला कमी वेळेत जास्त काम करायचं आहे
-
९. आम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिं
-
१०. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे. त्यामुळे सर्वांना वाटतं हे सरकार थोडं आधीच यायला हवं होतं. पण ठीक आहे योग जुळून येण्याच्या काही गोष्टी असतात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”