-
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये राज्य विधान भवनावर समाजवादी पक्षाने आज मोर्चा काढला होता. हा मोर्चा पोलिसांकडून रोखण्यात आला.
-
देशातील बरोजगारी आणि महागाईविरोधात समाजवादी पक्ष आक्रमक झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
-
आंदोलनादरम्यान अखिलेश यादव आणि सपा आमदारांनी रस्त्यावर बसून भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
-
या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येने सपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
-
केंद्राच्या ‘अग्निवीर’ योजनेबाबत तरुणांमध्ये रोष आहे. या योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांविरोधात खोटे खटले दाखल करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
-
“भाजपा सरकार सर्व विकत चालली आहे. रेल्वे, विमान, एयरपोर्ट भाजपाने विकले आहे”, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
-
देशातील दलित आणि गरिबांना भारतीय संविधानाने जे अधिकार दिले आहेत, ते खाजगीकरणामुळे हिरावल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.
-
अतिवृष्टीमुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने कुठलीही मदत केली नाही, असे यादव म्हणाले आहेत.
-
भाजपा लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप सपा कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान केला. यावेळी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच समाजवादी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शहरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
-
बेरोजगारी, महागाई, वीज पुरवठ्याचा अभाव आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराविरोधात सपा कार्यकर्त्यांनी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.
-
कायदा आणि सुव्यवस्थेचे समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पालन करावे, ही फारच मोठी अपेक्षा असल्याचा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.

गडगंज श्रीमंती लाभणार, मंगळ करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी