-
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
-
घरोघरी घटाची स्थापना करुन नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
-
दोन वर्षानंतर साजरा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
-
नाशिकच्या सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.
-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक सप्तश्रृंग गडावर श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा वास आहे.
-
मंदिराचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते घटस्थापनेची महापूजा करण्यात आली.
-
घटस्थापनेची मुख्य महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.
-
ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
-
पहाटे सप्तशृंगी देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा व मिरवणूक काढून देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला
-
देवीची पालखीचीही मिरवणूक काढण्यात आली.
-
राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री दादा भुसे यांनी पालखीला हात लावत उत्सवात सहभाग घेतला.
-
नवरात्रोस्तवास पहिल्याच दिवशी सप्तश्रृंग गडावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
-
दुपारपर्यंत जवळपास ६० हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. तर १० हजार भाविकांनी प्रसाद घेतला असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
-
यात्रा उत्सव दरम्यान दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा सुरु असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
-
सप्तशृंगगड परिसरात भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये, त्या दृष्टीने कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
-
मंदिर परिसरात २५६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत.
-
तसेच एकूण १७० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक कार्यरथ आहेत.
“येत्या ९ दिवसात काहीतरी घडू शकेल, आमचे…”; शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले…