-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला गेट वे ऑफ इंडिया येथे स्वच्छता मोहिमेत अमृता फडणवीस या कन्या दिविजासह सहभागी झाल्या होत्या.
-
२७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
-
‘यूएनडब्ल्यूटीओ’ने २७ सप्टेंबर १९८० रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला.
-
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने जबाबदार, शाश्वत आणि सार्वत्रिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन दिन घोषित केला आहे.
-
याचा फायदा पर्यटकांना आणि त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांना होतो तसेच देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते.
-
जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट जगभरातील पर्यटनाचे महत्त्व वाढवणे आणि सामान्य जनतेला हे दर्शवणे आहे की पर्यटन केवळ देशाच्या आर्थिक मूल्यांवरच नाही तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मूल्यांवर देखील परिणाम करते.
-
१९८० पासून, जागतिक पर्यटन दिन दरवर्षी जगभरात २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
-
(सर्व फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

Pimpri-Chinchwad : “आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांनी शांत रहावं म्हणून…” अजित पवारांचं विधान!