-
राज्यात सद्या पालकमंत्री पदावरून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगताना दिसतो आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर खोचक टीका आणि टोलेबाजी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एकाचवेळी सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आल्यानंतर अजित पवारांनी त्यावर टीका केली होती. त्याल आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आल्यानंतर अजित पवारांनी त्यावर खोचक शब्दांत टीका केली होती.
-
“आम्हाला एकाच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळताना नाकी नऊ यायचं. हे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सांभाळणार आहेत”, असं अजित पवार म्हणाले होते.
-
यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी गुरुमंत्र देण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.“जिल्हे कसे मॅनेज करायचे त्याचा गुरुमंत्र मी अजित पवारांना नक्कीच देईन”, अशा शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला होता.
-
देवेंद्र फडणवीसांच्या टोल्यावर अजित पवारांनी प्रतिटोला लगावला लगावत. “मी आता त्यांना पत्र पाठविणार आहे की ट्रेनिंगसाठी केव्हा येऊ? त्या ट्रेनिंगकरता काही फी लागणार आहे का? की ते मोफत दिलं जाणार आहे?
-
त्याबाबत मी त्यांच्याशी हितगुज करतो. त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो”, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली होती.
-
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या मिश्लिक टीप्पणीला प्रत्युत्तर दिले आहे. “आपण हे ट्रेनिंग सेशन ऑनलाईन करू. त्यामुळे त्यांना तसदी घ्यावी लागणार नाही.
-
तसेच मी त्यांना गुरूकिल्ली एवढीच सांगेन की, ज्याप्रकारे ते १० ते १२ कारखाने साभाळतात, त्याप्रमाणे पाच-सहा जिल्हे सांभाळणं कठीण नाही”, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.

पिंपरी-चिंचवड: मविआच्या चिंता वाढणार? शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे अपक्ष म्हणून पोटनिवडणूक लढणार; म्हणाले, “मला अपेक्षा होती की…!”