-
वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा खून करण्यात आला होता. तिचा प्रियकर आफताब अमिन पूनावाला याने तिचा गळा आवळून खून केला.
-
त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे आफताबने केले होते. हे तुकडे आफताबने फ्रिजमध्ये ठेवले होते. तो रोज एक-एक श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात जाऊन फेकायचा.
-
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर आफताब बंबल अॅपच्या माध्यमातून आणखी एका तरुणीच्या संपर्कात आला होता. जेव्हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये होते, तेव्हा ही तरुणी दोनवेळा दिल्लीतील छतरपूर येथील फ्लॅटमध्ये देखील आली होती, असं समोर आलं होतं. पण, तिला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती या तरुणीने पोलिसांना दिली आहे.
-
श्रद्धाच्या खूनानंतर आफताब बंबल अॅपच्या माध्यमातून १५ ते २० मुलींच्या संपर्कात होता. बंबल अॅपची तपासणी केली असता, ३० मे रोजी आफताब ज्या तरुणीच्या संपर्कात होता, ती सापडली आहे.
-
ही तरुणी मानसोपचारतज्ज्ञ आहे. तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच, आफताबने श्रद्धाची अंगठी तिला दिली होती, ती जप्त करण्यात आली आहे.
-
पोलिसांना तरुणीने दिलेल्या जबाबात सांगितलं की, ऑक्टोबर महिन्यात आफताबच्या फ्लॅटला भेट दिली होती. पण, तिला खूनाची अथवा मृतदेहाचे तुकडे घरात असल्याची माहिती नव्हती. आफताब कधीही घाबरलेले दिसला नाही.
-
तो सामान्य आणि काळजी घेणारा वाटला. त्याच्याकडे अनेक परफ्यूमचा संग्रह होता. तो तिला अनेकदा परफ्यूम भेट म्हणूनही देत असे.
-
आफताबला धुम्रपानाचे खूप व्यसन होतं. धुम्रपानाचे व्यसन सोडण्याबद्दल अनेकवेळा तो बोलला होता. तसेच, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची खूप आवड होती. वेगवेगळ्या हॉटेल्समधून मांसाहारी जेवण आफताब मागवत असे.
-
मात्र, श्रद्धाचा खून आफताबने केल्याचं समोर आल्यानंतर मानसिक धक्का बसला आहे. त्यावर समुपदेशन देखील सुरु आहे, असे तरुणीने पोलिसांनी तपासात सांगितलं आहे.
डिंपल कपाडियांची नात झाली १८ वर्षांची, दिसते खूपच ग्लॅमरस! पाहा फोटो