-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात आज कर्नाटककडून आगीत तेल ओतण्याचे काम केलं. महाराष्ट्रातील काही ट्रकची बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
-
यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे.
-
पुढील २४ तासांत परिस्थिती निवळली पाहिजे. नाहीतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदारी राहतील, असा इशारा शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला दिला.
-
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल, तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, अशी कानउघडणी शरद पवार यांनी केली.
-
चार दिवसांपूर्वी माझ्या एक डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन १० दिवसांत होणार आहे. पण, सीमाभागात घडत असलेल्या गोष्टी पाहून भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
-
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही जणांची मला मेसेज केले आहेत. त्यात बेळगावची स्थिती अत्यंत गंभीर आहे. समितीच्या मुख्य कार्यकर्त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्या कार्यालयासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
-
महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्यांची चौकशी आणि प्रत्येक रस्त्यांची नाकेबंदी करण्यात आली आहे. १९ डिसेंबरला कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन अधिवेशन होणार आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर दहशतीचं वातावरण तयार करण्यात येत आहे. यासाठी तुम्ही येऊन धीर द्यावा, असं एकीकरण समितीने मेसेज केल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
-
येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल.
-
कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे, असेही शरद पवार यांनी सांगितलं.

शनिदेव सोन्याच्या पायांनी मार्गी होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षभर होऊ शकतो प्रचंड धनलाभ