-
शिवसेनेतील बंडखोरीनंतर या फुटीला आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाने केला.
-
नंतर थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच आरोप झाले. त्यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली, असा आरोप शिंदे गटाने केला.
-
मात्र, आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपानेच शिवसेनेतील फुटीसाठी ‘ऑपरेशन’ला सुरुवात केल्याचं मोठं विधान केलं आहे.
-
ते जळगावमध्ये एका सभेत बोलत होते. या सभेत गिरीश महाजन यांनी नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…
-
हे खरं आहे की, आम्ही शिवसेनेमधील ‘ऑपरेशनला’ सुरुवात केली होती, पण यात यश येईल यावर आम्हालाही विश्वास बसत नव्हता – गिरीश महाजन
-
मात्र, एकनाथ शिंदे बाहेर निघाले आणि पुढे गेले. बघताबघता सर्व सैन्य त्यांच्यामागे गेलं. शेवटी जमलं. झालं एकदाचं – गिरीश महाजन
-
या सगळ्या गोष्टी जमून आल्या, घडून आल्या. शिवसेनेसारख्या पक्षातून ४० लोक उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले – गिरीश महाजन
-
हे सोपं नव्हतं. शेवटी लोक आले आणि एकनाथ शिंदेंच्या मागे उभे राहिले. त्यामुळे त्यांच्यामागे अनेकांचे आशीर्वाद आहेत – गिरीश महाजन
-
आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद होता – गिरीश महाजन
-
आम्हाला वाटलं होतं की, काही खरं नाही. मधेच हे मिशन फेल झालं तर कसं काय होईल? – गिरीश महाजन
-
४० लोकं जमा करणं सोपं नव्हतं. कारण पुढारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे. मात्र सगळे आमच्या पाठिशी उभे राहिले – गिरीश महाजन
-
गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन खरे बोलले त्यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो, असं म्हटलं.
-
तसेच भाजपाला महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत असा आरोप केला.
-
(सर्व छायाचित्र – संग्रहित आणि गिरीश महाजन फेसबूक पेज)
ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…