-
टर्की देश साखळी भूकंपांमुळे हादरला आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
-
या संकट काळात भारताने मदतीचा हात पुढे केला आहे.
-
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) शोध आणि बचाव पथकाची पहिली तुकडी टर्कीकडे रवाना झाली आहे.
-
एनडीआरएफच्या जवानांसोबत विशेष प्रशिक्षित श्वान पथकं आहे.
-
याशिवाय ड्रिलिंग मशीन आणि इतर आवश्यक उपकरणांसह भूकंप मदत सामग्रीही एनडीआरएफच्या जवानांबरोबर पाठवण्यात आली आहे.
-
भारताकडून भूकंपाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी वैद्यकीय साहित्य पुरवठाही केला गेला आहे.
-
एनडीआरएफच्या टीमसोबतच वैद्यकीय पथकही टर्कीकडे रवाना झाले आहे.
-
टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्का बसत आहेत.
-
सोमवारी तीन भूकंपाचे धक्के बसल्यानंतर आज (मंगळवारी) सकाळी पुन्हा एकदा चौथा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल होती.
-
या भूकंपांमुळे टर्की आणि सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
-
या घटनेत अनेक नागरिक ढासळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली बदले असून त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे.
-
टर्कीचे उप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ हजार ०२२ जणांचा शोध घेण्यात आला असून ७ हजार ८४० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
-
या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं.
-
त्यानुसार तुर्की सरकारच्या मदतीने भारताने वैद्यकीय पथकासह एनडीआरएफचं पथक भूकंपग्रस्त भागात पाठवले आहेत.
-
एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीला असलेला प्रशिक्षित श्वान दिसत आहे.
