-
Rahul Gandhi Disqualified as Member of Lok Sabha: राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून आता जवळपास चार वर्षांनी ही कारवाई करण्यात आली आहे.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?
-
राहुल गांधींच्या या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.
-
सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता
-
यानंतर सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
-
संपूर्ण मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.
-
राहुल गांधींना उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला आहे. असं असलं तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे
-
लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल, समाजवादी पार्टीचे नेते आझम खान, लालू प्रसाद यादव, भाजपाचे आमदार विक्रम सैनी यांच्यावर सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.
“मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”