-
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतल्या बँका बुडीत निघत असून, त्याचा बँकिंग क्षेत्रानंही धसका घेतला आहे. त्यामुळे भारतातही बँकिंग क्षेत्रात आतापासून सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत.
-
भारतात SBI, ICICI आणि HDFC अशा तीन बँका आहेत, ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या बँका बुडणे केंद्र सरकारला परवडणारे नाही.
-
अमेरिकन बँका बुडाल्याचा भारताच्या बँकिंग व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नसला तरी एकामागून एक बँका बुडण्याच्या या घटनांमुळे लोकांची चिंता वाढली आहे.
-
कॅपिटल बफर म्हणजे बँकेच्या कामासाठी लागणाऱ्या रोख रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त रोकड ठेवणे. जेणेकरून जेव्हा रोख रकमेची मागणी जास्त असेल, तेव्हा ती पूर्ण करता येईल.
-
परंतु भारतात अशा तीन बँका आहेत, ज्या इतक्या मोठ्या आहेत की, त्या बुडू शकत नाहीत. अशा बँकांना D-SIB म्हणतात. RBI ने ICICI बँक, SBI आणि HDFC बँकेचा D-SIB मध्ये समावेश केला आहे.
-
आपली बँक कधी बुडाली तर आपल्या पैशाचे काय होईल, अशी भीती लोकांना वाटते, असे झाल्यास सरकार पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. RBI या बँकांना D-SIB यादीत ठेवते आणि त्यांच्यासाठी कठोर नियम बनवलेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँका बुडाल्या आहेत.
-
RBI देशातील सर्व बँकांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर, त्यांच्या ग्राहकांच्या आधारावर पद्धतशीर महत्त्व स्कोअर देते.
-
बँक रन म्हणजे जेव्हा बँकेचे अनेक ग्राहक एकाच वेळी त्यांचे पैसे काढू लागतात आणि बँकेतील रोख ठेव कमी होते किंवा संपते, त्याला बँक रन म्हणतात.