-
मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत १ एप्रिलपासून असे अनेक मोठे बदल झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
-
एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असून, लहान बचत योजनेवरील सुधारित व्याज ते नवीन आयकर प्रणालीपर्यंत अनेक छोटे आणि मोठे बदल १ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत.
-
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी १ एप्रिल २०२३ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीसाठी (Q1) विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले. दीर्घकालीन बचत योजनेतील ५ वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर आता ७.५% व्याज मिळणार आहे.
-
१ एप्रिल २०२३ पासून फक्त सोन्याचे दागिने हे सहा अंकी अल्फान्यूमेरिक HUID म्हणजे हॉलमार्क (Hallmark unique identification) असलेले ग्राह्य धरले जाणार आहेत. ४ अंकी हॉलमार्क क्रमांक आजपासून नाकारला जाणार आहे.
-
त्यामुळे केडीएमचं सोनं आता घेणं टाळलं पाहिजे, तसेच हॉलमार्ग असलेलं सोनं खरेदी केलं पाहिजे.
-
तसेच नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत पगारदार लोकांसाठी कर सवलत ५ लाख रुपयांवरून ७ लाख रुपये करण्यात आली आहे.
-
१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्र्यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती.
-
केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून काही जीवन विमा पॉलिसी करपात्रतेच्या अंतर्गत आणल्या आहेत.
-
परंतु ज्यांचा एकूण प्रीमियम ५ लाखांपेक्षा जास्त असेल अशा जीवन विमा पॉलिसींवरच कर आकारला जाईल.
-
३१ मार्च २०२३ पर्यंत जारी केलेल्या विमा पॉलिसींवर या नवीन नियमाचा परिणाम होणार नाही, याची नोंद घेण्यात आली आहे.

मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा, पोलिसांना म्हणाली, “मी काम…”