-
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना जोरदार वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता, त्यांनी लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील लोकसभा उमेदवारांची चाचपणी केली आहे.
-
लोकसभेसह विधानसभेसाठीही आमची जुळवाजुळव सुरू आहे, असं मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतात. आता यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो. राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या उमेदवार असतील”, असं पाटील म्हणाले.
-
“आमची लोकसभेसाठीची नावे जवळपास निश्चित झाले असून, जळगावची जबाबदारी आम्ही एकनाथ खडसे यांच्यावर सोडलेली आहे,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
-
“तर साताऱ्यासाठी थोड्या दिवसांत उमेदवार निश्चत होईल.”
-
“आम्ही फक्त लोकसभा नाही, तर विधानसभेपर्यंत जुळवाजुळव करत आलो आहोत”, अशी माहिती पाटलांनी दिली.
-
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. या बॅनरची राज्यात मोठी चर्चाही झाली. यावर पाटील म्हणाले, “लोकशाहीत कुणीही बॅनर लावू शकतं. समर्थक कुणाला कुठेही नेऊन बसवतात.”
-
“त्यामुळे त्यावर काही हरकत घेण्याचं कारण नाही. शरद पवारांकडे मुख्यमंत्री व्हावे असे अनेक नेते आहेत”, असं पाटलांनी सांगितलं.
-
“उद्योगपती गौतम अदाणी यांनी नवीन उद्योग सुरू केला आहे. त्याच्या उद्घाटनाला शरद पवार गेले, तर काही गैर नाही. भाजपा विरोधातील इंडिया आघाडीत शरद पवार महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कुणी शंका घेण्याची गरज नाही,” असं जयंत पाटील म्हणाले. ( सर्व छायाचित्र – संग्रहित )

धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या