-
भारताला कुपोषितांचा आणि गरिबांचा हिणवलं जायचं. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला. गरिबीतून बाहेर पडायचं असेल, तर भारताचे धोरणं राबवावे लागतील, असं जगात सांगितलं जातं. हे परिवर्तन मोदींनी ९ वर्षात करून दाखवलं आहे, असं कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
-
“जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची झाली आहे. करोनानंतर पश्चिमी जग मंदीच्या सावटाखाली आहे. या परिस्थितीत भारताच्या प्रगतीचा वेग मंदावला नाही,” असं फडणवीसांनी म्हटलं.
-
“जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. भारताला जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था करून दाखवणार, असं मोदींनी सांगितलं आहे. मोदींची भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धती आणि नेतृत्वावर भारताच्या जनतेनं विश्वास दाखवला, त्यामुळे हे संभव झालं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
“एकेकाळी आम्ही जगातील देशांच्या पाठिमागे पळायचे. पण, जगातील देश भारताच्या पाठिमागे येताना दिसत आहेत. मोदींना जागतिक पातळीवर महत्व मिळत आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.
-
“श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळला आपण मदत करतोय. त्यामुळे मजबूत देश म्हणून आपण प्रस्थापित होत आहे. याने जगात आपली ताकद आणि व्यवहारही वाढत आहे. जगात पंतप्रधानांना कुणी बॉस म्हणतेय, कुणी पाय पडतेय,” असं फडणवीस म्हणाले.
-
“भारत पुढे जातोय, हे सर्वांनाच आवडेल, असं नाही. जगाच्या पाठिवर अनेक शक्ती भारताच्या वाटचालीमुळे घाबरलेल्या आहेत. भारताची वाटचाल थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आमच्याही देशातील लोक बळी पडली आहेत. देशात भारतविरोधीत वातावरण तयार करत आहेत. भारताच्या प्रगतीबाबत शंका निर्माण करत आहेत. यात राजकीय आणि अराजकीय लोक आहेत,” असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. ( संग्रहित फोटो )

२० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक, अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा संशय