-
रामाच्या मंदिरात राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २२ जानेवारीच्या दिवशी करण्यात आली. त्यानंतर राम मंदिर हे दर्शनासाठी खुलं झालं आहे. (सर्व फोटो सौजन्य-रामजन्मभूमी ट्रस्ट)
-
रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या आधी विधीवत पूजा करण्यात आली.
-
रामाच्या मंदिरात मंगळवारच्या दिवशी म्हणजेच मंदिर खुलं झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पाच लाख भक्त आले होते. तसंच आजही मंदिरात गर्दी होती.
-
राम मंदिरातल्या रामाचं दर्शन सुरु झाल्यानंतर आता रामाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांचा मेळा अयोध्येत जमतो आहे.
-
पाच वर्षांच्या रामाचं रूप हे या मंदिरात पाहण्यास मिळतं आहे. ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे.
-
रामाचं हे रुप बाळ रुप आहे. या मंदिरात रोज सकाळी सहा वाजता मंगल आरती केली जाईल. ज्या आरतीला काकड आरतीही म्हटलं जातं.
-
यानंतर राम मंदिरातील राम मूर्तीची सकाळी ७ वाजता श्रृंगार आरती होईल. या आरतीनंतर रामाला नैवैद्य दाखवला जाईल.
-
दुपारी १२ वाजता रामाच्या मूर्तीची माध्यन्ह आरती होईल. त्यानंतर नैवैद्य दाखवला जाईल.
-
रात्री ८ वाजता रामाची संध्या आरती होईल. तर रात्री १० वाजता शेजारती केली जाणार आहे. त्यानंतर मंदिर बंद होईल जे आत्ता दर्शनासाठी सुरु ठेवण्यात आलं आहे.
-
राम मंदिरात सध्या खूप गर्दी होते आहे. रामाच्या मंदिराची प्रतीक्षा मोठ्या संघर्षानंतर संपली आहे.

देहू: एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत; ३२ लाखांच कर्ज…