-
आज मनोहर जोशी यांचं निधन झालं. पहाटे तीन वाजण्यच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
-
मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दादरच्या स्मशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ( सर्व फोटो-दीपक जोशी )
-
मनोहर जोशी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती होती.
-
मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याआधी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. मनोहर जोशी हे जोशी सर म्हणून शिवसेनेत प्रसिद्ध होते.
-
मनोहर जोशी यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा शिवसेना भवनाच्या समोरुनच गेली. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती.
-
दादर येथील स्मशानभूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी सर यांना बाळासाहेब ठाकरे पंत म्हणून हाक मारत.
-
मनोहर जोशी यांना निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तसंच त्यांना लोकसभा अध्यक्ष, खासदार अशी पदंही भुषवता आली. शिवसेनेसाठी त्यांनी आयुष्य वेचलं.
-
दादरच्या शिवसेना भवनासमोरही मनोहर जोशींना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती.
-
मनोहर जोशी यांनी शिवसेनेत असताना विविध पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांचं पार्थिव अनंतात विलीन झालं.

Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”