-
अमेरिकेच्या थिंक टँक या संस्थेने जगातील ३१ बलाढ्य देशांमध्ये एक सर्वेक्षण केले आहे. तेथील किती लोक लोकशाहीवर समाधानी आहेत आणि किती लोक नाहीत? याचा अहवाल आता समोर आला आहे. भारताची राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहे असे ज्यांना वाटते त्यांच्या तोंडावर ही चपराक आहे. कारण या अहवालात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Indian Express)
-
अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारखे देश भारताच्या लोकशाहीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांची मात्र स्थिती खूपच वाईट आहे. या देशांतील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या लोकशाहीवर खूश नाही. प्यू रिसर्च सेंटरचा ताजा अहवाल काय म्हणतो ते आपण जाणून घेऊयात. (Pexels)
-
अमेरिका हा जगातील सर्वात जुनी लोकशाही असणारा देश आहे असे म्हटले जाते, परंतु येथील निम्म्याहून अधिक लोकसंख्या तिथल्या लोकशाही व्यवस्थेवर नाराज आहे. केवळ ३१ टक्के अमेरिकन नागरिक लोकशाहीवर समाधानी आहेत आणि ६८ टक्के असमाधानी आहेत. (Pexels)
-
उत्तर अमेरीका
उत्तर अमेरिकेतील तीन देशांचे अहवाल आले आहेत. ज्यामध्ये अमेरिकेशिवाय कॅनडा आणि मेक्सिकोचाही समावेश आहे. लोकशाही आणि धर्मावर गदारोळ माजवणाऱ्या कॅनडाची परिस्थितीही अत्यंत वाईट आहे. येथे केवळ ५२ टक्के लोक लोकशाहीवर समाधानी आहेत आणि ४५ टक्के लोक असमाधानी आहेत. मेक्सिकोची निम्मी लोकसंख्या लोकशाहीवर खूश आहे आणि उरलेली अर्धी लोकसंख्या असमाधानी आहे. (Pexels) -
दक्षिण अमेरिका
दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. येथील केवळ ११ टक्के लोक लोकशाहीवर खुश आहेत तर ८९ टक्के लोक असमाधानी आहेत. कोलंबियामध्ये, २१ टक्के लोक समाधानी आहेत आणि ७७ टक्के लोक असमाधानी आहेत. चिलीमध्ये, ३० लोक समाधानी आहेत आणि ६६ टक्के लोक देशाच्या लोकशाही व्यवस्थेबद्दल असमाधानी आहेत. ब्राझील आणि अर्जेंटिनामधील केवळ ४४ टक्के लोक समाधानी आहेत. (Pexels) -
युरोप
युरोपातही अशीच परिस्थिती आहे. ग्रीसमध्ये ७८ टक्के, ब्रिटनमध्ये ६०, फ्रान्समध्ये ६५ टक्के, इटलीमध्ये ६७ टक्के, स्पेनमध्ये ६८ टक्के, नेदरलँडमध्ये ५८ टक्के आणि जर्मनीतील ४५ टक्के लोक तेथील लोकशाहीवर समाधानी आहेत. युरोपमधला स्वीडन हा एकमेव देश आहे जिथे ७५ टक्के लोक लोकशाहीवर खूष आहेत. (Pexels) -
आशिया
भारत आणि सिंगापूर वगळता आशियातील इतर देशांची स्थितीही वाईट आहे. जपानमधील ६७ टक्के, दक्षिण कोरियामधील ६३ टक्के, श्रीलंकेतील ५८ टक्के, मलेशियामधील ४९ टक्के, फिलीपिन्समधील ४२ टक्के, थायलंडमधील ३५ टक्के लोक त्यांच्या देशातील लोकशाही व्यवस्थेबद्दल असमाधानी आहेत. (Pexels) -
भारताची स्थिती
सिंगापूर हा केवळ आशियातीलच नाही तर जगातील पहिला देश आहे जिथे जास्तीत जास्त ८० टक्के लोक तेथील लोकशाहीवर समाधानी आहेत. भारत हा आशियातील दुसरा आणि जगातील तिसरा देश आहे जिथे ७७ टक्के नागरिक लोकशाही व्यवस्थेवर समाधानी आहेत. आता लोकशाही आणि संविधानाच्या नावाने रडणाऱ्यांनी हा अहवाल जरूर पहिला पाहिजे. (Indian Express) -
सोशल मीडियावर उपलब्ध असलेली अहवालाची प्रत हेही वाचा- PHOTOS : पंतप्रधान मोदींचे युरोपातून अमेरिकेला उत्तर; पाकिस्तानलाही दिला इशारा!

२७ वर्षानंतर न्यायदेवता शनी बदलणार आपली चाल,’या’ राशींचे नशीब सोनासारखे चमकणार! प्रगतीसह होईल खूप कमाई