-
शिंदे सरकारच्या शेवटच्या विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या. महाविकास आघाडीच्या वतीने तिसरी जागा जिंकण्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांनी जोर लावला होता, पण मते फोडण्यात अपयशी ठरल्याने ते पराभूत झाले. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
या निवडणुकीत काँग्रेसची सहा मते फुटल्याचा संशय असून, पक्षाने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला झाला. अजित पवार गटाची मते फोडण्याची शरद पवार गटाची रणतीनी यशस्वी झाली नाही. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन तर शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार निवडून आला. भाजपचे १०३ आमदार असून, १२ अपक्षांचा पाठिंबा आहे. पण भाजपला पहिल्या पसंतीची ११८ मते मिळाली. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
भाजपचे १०३ आमदार असून, १२ अपक्षांचा पाठिंबा आहे. पण भाजपला पहिल्या पसंतीची ११८ मते मिळाली. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ४२ आमदार असले तरी पक्षाच्या दोन उमेदवारांना मिळालेली मतांची संख्या ४७ आहे. यामुळेच भाजप आणि अजित पवार गटाला महाविकास आघाडी किंवा अन्य पक्षांची मते मिळाली आहेत. (Express Photo By Amit Chakravarty)
-
शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा जाहीर केला होता. याशिवाय अन्य मते मिळविण्याचे पाटील यांनी जाहीर केले होते. पण पवार गटाची १२ मते वगळता अन्य मते पाटील यांना मिळालेली नाहीत. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
विधानसभेत काँग्रेसचे सध्या ३७ आमदार आहेत. पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची ३० मते देण्यात आली होती. पण सातव यांना प्रत्यक्ष २५ मते मिळाली आहेत. यामुळे पाच मते फुटल्याचे स्पष्ट झाले.
-
काँग्रेसने सहा मते शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना दिली होती. यातील एक मत फुटल्याचा संशय आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य तीन आमदारांची मते फुटल्याचा संशय आहे. फुटीरांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले.
-
विधानपरिषद निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे – २६ (विजयी), परिणय फुके – २६ (विजयी), योगेश टिळेकर – २६ (विजयी), अमित गोरखे – २६ (विजयी), सदाभाऊ खोत – २६ (विजयी) (Express Photo By Ganesh Shirsekar) -
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी – २४ (विजयी), कृपाल तुमाने – २५ (विजयी) (Express Photo By Ganesh Shirsekar) -
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर – २३ (विजयी), शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी) (Express Photo By Amit Chakravarty) -
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव – २५ (विजयी)
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर – २४ (विजयी)
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) – १२ (पराभूत) (Express Photo By Ganesh Shirsekar)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही