-
स्नेहा दुबे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वसई मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली.
-
त्यांनी या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना पराभूत केले.
-
हितेंद्र हे वसईचे तीन दशकांहून अधिक काळ आमदार होते. हितेंद्र ठाकूर यांनी वसई विधानसभा मतदारसंघात अनेक वेळा निवडणूक जिंकली आहे, परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
-
स्नेहा दुबेंनी ७७,५३३ मतं मिळवून विजय मिळवला, तर हितेंद्र ठाकूर यांना ७४,४०० मतं मिळाली.
-
हा विजय स्नेहा यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जाणून घेउयात त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल.
-
त्या विवेक पंडित यांच्या कन्या आहेत, विवेक पंडित यांनी २००९ मध्ये वसईमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती.
-
स्नेहा दुबे यांनी त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात स्थानिक पातळीवर केली. त्यांनी भाजपात सामील होऊन सक्रिय कार्यकर्त्या म्हणून काम सुरू केले.
-
त्यांच्या कार्यामुळे त्यांना स्थानिक स्तरावर लोकप्रियता मिळाली, ज्यामुळे त्यांना यंदा विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली.
-
स्नेहा दुबे यांनी उच्च शिक्षण घेतले असून वकिलीची सनद प्राप्त केली आहे. २०१७ मध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
-
दरम्यान या निवडणुकीत स्नेहा दुबे पंडित यांना हितेंद्र ठाकूर, विजय पाटील (महाविकास आघाडी), आणि इतर अपक्ष उमेदवारांशी तिरंगी लढाई करावी लागली. (सर्व फोटो सौजन्य- स्नेहा दुबे पंडित सोशल मीडिया)
हेही पाहा – एकनाथ शिंदेंचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार राज्याचा कारभार; शपथविधीबाबत उत्सुकता शिगेला!
![Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/funny-viral-quote-in-bike-photo.png?w=300&h=200&crop=1)
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल