-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा वाईल्डलाईफचे उद्घाटन केले.
-
वनतारामध्ये दोन हजारांहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेण्यात येते.
-
पंतप्रधान मोदी यांनी आज वनतारा येथे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा आढावा घेतला. तसेच वनतारा येथील वन्यजीव रुग्णालयालाही भेट दिली. प्राण्यांवरील उपचारांसाठी येथे असलेल्या उपकरणांची त्यांनी माहिती घेतली.
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वन्यजीव रुग्णालयातील एमआरआय कक्षाला भेट दिली. एशियाटीक सिंहाचे एमआरआय करताना त्यांनी पाहणी केली. याशिवाय बिबट्याच्या ऑपरेशन होत असतानाही त्यांनी उपचाराचा आढावा घेतला.
-
वनतारा येथे देशभरातून रेस्क्यू केलेल्या हत्तींना ठेवले गेले आहे. येथे एलिफंट रुग्णालय असून तेथे हत्तींवर उपचार केले जातात. या रुग्णालयालाही पंतप्रधान मोदींनी भेट दिली.
-
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आशिया आणि इतर प्रजातींच्या सिहांच्या पिल्लांशी खेळण्याचा आनंद घेतला. त्यांना जवळ घेत दूध पाजले.
-
यावेळी लुप्तप्राय होत असलेल्या बिबट्याच्या प्रजातीच्या पिलालाही त्यांनी जवळ घेऊन दूध पाजले. याशिवाय पांढऱ्या सिंहाच्या छाव्यालाही त्यांनी दूध पाजले. हा छावा वनतारा केंद्रातच जन्माला आला.
-
प्राणीसंग्रहालयालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. गोल्डन टायगर आणि स्नो टायगरला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. इथे बसून पंतप्रधान मोदींनी फोटो काढले.
-
वनताराला नुकताच ‘प्राणी मित्र’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या निमित्ताने वनतारा पुनर्वसन केंद्राचे महत्त्व, तेथील सोयी-सुविधा, वन्यजीवांना देण्यात येणारे उपचार याचे मोदींनी कौतुक केले.
-
वनतारा हे गुजरातमधील जामनगर येथे वसलेले एक विशेष वन्यजीव पुनर्वसन केंद्र आहे. पंतप्रधान मोदींच्या वनतारा दौऱ्यातील अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना