-
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी आदमपूर हवाई दल तळावर पोहोचले आणि तेथे तैनात असलेल्या हवाई दल आणि लष्कराच्या जवानांची भेट घेतली. अलिकडेच, पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसवर हल्ला करून भारताचे मोठे नुकसान केल्याचा प्रचार केला जात होता. (एएनआय फोटो)
-
त्यामुळे अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदी यांनी आदमपूर एअरबेसला दिलेली भेट ही फक्त सैनिकांचे मनोबल वाढवण्यापुरती मर्यादीत नसून यामधून ‘भारत हा घाबरणारा देश नाही, तर योग्य उत्तर देणारा देश आहे’ हा संदेश देखील पोहचवण्यात आला. – (छायाचित्र स्रोत: @narendramodi/X)
-
पंतप्रधान मोदींनी सैनिकांचा सन्मान केला
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या भेटीचे फोटो शेअर केले आणि लिहिले – ‘आज सकाळी मी AFS आदमपूरला भेट दिली आणि आमच्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो.’ (छायाचित्र स्रोत: @narendramodi/X) -
त्यांनी पुढे लिहिले, ‘धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या लोकांबरोबर राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत नेहमीच त्यांचा आभारी राहील.’ (छायाचित्र स्रोत: @narendramodi/X)
-
सैनिकांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या धाडसाचे कौतुक तर केलेच, यासह देश त्यांचे योगदान कधीही विसरू शकत नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. आदमपूर हवाई तळावर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीने हे सिद्ध झाले की भारत आपल्या सैनिकांबरोबर उभा आहे – . (छायाचित्र स्रोत: @narendramodi/X)
-
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची घबराट
सोमवारी रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती दिली होती आणि म्हटले होते की या कारवाईमुळे पाकिस्तान खूप हादरला आहे. (छायाचित्र स्रोत: @narendramodi/X) -
ते म्हणाले, भारताच्या कृतीमुळे पाकिस्तान अत्यंत निराश झाला आहे. या निराशेत, त्याने आणखी एक धाडस केले आणि आपले लष्करी तळ, शाळा, मंदिरे आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य केले. पण यामध्येही ते उघड पडले. (छायाचित्र स्रोत: @narendramodi/X)
-
या विधानाच्या १२ तासांच्या आत, पंतप्रधानांच्या आदमपूर हवाई तळावर गेल्याने पाकिस्तानला हे दाखवून देण्यात आले की भारत आता फक्त बोलणार नाही तर बळाला बळाने उत्तर देईल. (एएनआय फोटो)
-
“शत्रूचे वैमानिक नीट का झोपू शकत नाहीत?”
सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आदमपूर एअरबेसच्या भिंतीसमोर उभे आहेत. भिंतीवर लिहिले आहे—”शत्रूचे वैमानिक नीट का झोपू शकत नाहीत?” या ओळीचा संदर्भ स्पष्ट आहे – भारतीय हवाई दलाची ताकद आणि सज्जता शत्रूंना प्रत्येक क्षणी भीतीने गागे राहण्यास भाग पाडते. (छायाचित्र स्रोत: @narendramodi/X) -
सैनिकांनी दाखवला उत्साह, ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देण्यात आल्या.
पंतप्रधान मोदींच्या आगमनाने सैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी आदमपूर एअरबेस दुमदुमून गेला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांना प्रोत्साहन दिले आणि यावेळी अनेक फोटो शेअर केले. (एएनआय फोटो) -
“दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालत नाहीत”
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की आता भारताचे धोरण स्पष्ट आहे – “दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही आणि पाणी आणि रक्त देखील एकत्र वाहू शकत नाही.” (एएनआय फोटो) -
ऑपरेशन सिंदूर चालू आहे…
पंतप्रधानांचा आदमपूर दौरा हा ऑपरेशन सिंदूर अजून संपलेला नाही याचे स्पष्ट संकेत आहेत. जरी भारताने १० मे रोजी पाकिस्तानसोबत लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शवली असली तरी, तो फक्त एक विराम आहे, शेवट नाही. भारताची पुढील कारवाई पाकिस्तानच्या वर्तनावर अवलंबून असेल. (छायाचित्र स्रोत: @narendramodi/X)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case