-
दृष्टी आयएएस कोचिंग क्लासचे संस्थापक विकास दिव्यकिर्ती यांनी लहान मुलांबद्दल धोक्याचा इशारा देणारी माहिती दिली आहे. आजच्या काळात पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, याबद्दल त्यांनी सांगितले आहे. (Photo: Unsplash)
-
विकास दिव्यकिर्ती म्हणाले की, या काळातील पिढी पूर्णपणे वेगळी आहे. त्यांना जाळ्यात ओढणारे एक रॅकेट चालू आहे आणि जर तुमचे मूल त्यात अडकले तर त्यातून बाहेर पडणे खूप कठीण आहे. (Photo: Pexels)
-
विकास दिव्यकिर्ती यांनी इंटरनेटबद्दल बोलताना म्हटले की, आजकालची मुले खूप हुशार झाली आहेत. ते इंटरनेटवर ज्या गोष्टी शोधू शकतात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. (Photo: Pexels)
-
या युगात जन्मलेली मुले इंटरनेट युगातील आहेत. पालक याबाबत अनभिज्ञ असले तरी मुले इंटरनेटच्या बाबतीत त्यांच्या पालकांपेक्षा खूप पुढे आहेत. (Photo: Pexels)
-
विकास दिव्यकिर्ती म्हणतात की जेव्हा ५ वर्षांचा मुलगा शाळेत जातो तेव्हा त्याला त्या गोष्टी कळतात ज्या पूर्वी १५-१६ वर्षांच्या मुलांना माहित होत्या. (Photo: Pexels)
-
तो मुलगा फोनवर अशा सर्व गोष्टी पाहत आहे, ज्या त्याने पाहू नयेत. आजच्या पिढीतील मुले लवकर प्रौढ होत आहेत. हे वैद्यकीय शास्त्रानेही मान्य केले आहे. (Photo: Pexels)
-
जेव्हा मुले इंटरनेटवर जातात तेव्हा जगभरातील सायबर गुंड त्यांची वाट पाहत असतात. त्यांना मुलाचे मानसशास्त्र माहीत आहे. मुलं इंटरनेटवर जे शोधतात, त्या गोष्टी सायबर गुंड हॅक करतात. त्यातून पुढे मुलांना धमकावले जाते. (Photo: Pexels)
-
९-१० किंवा ११-१२ वर्षांचा एखादा मुलगा काही व्हिडिओ किंवा फोटो पाहत असेल, तर सायबर गुन्हेगारही तशाच प्रकारचा मजकूर त्याला दाखवू लागतात. जर मुलगी असेल तर तिच्याशी मुलगा म्हणून बोलू लागतात आणि जर मुलगा असेल तर मुलगी म्हणून संवाद साधतात. मग हळूहळू ते मुलाचा-मुलीचा ताबा घेऊ पाहतात. (Photo: Pexels)
-
मुले हे सर्व त्यांच्या पालकांपासून गुप्तपणे करतात. विकास दिव्यकिर्ती स्पष्ट करतात की जगात असे मोठे रॅकेट चालू आहेत ज्यांची पालकांना माहिती असणे आवश्यक आहे. (Photo: Pexels)
-
एक ११-१२ वर्षांचा मुलगा त्याच्या खोलीत लॅपटॉपवर एका २२-२३ वर्षांच्या परदेशी मुलीबरोबर व्हिडिओ चॅट करत आहे, जी कदाचित एक व्यावसायिक आहे. ती मुलगी जे काही सांगते, ते सर्व मुलगा करत राहतो. कारण त्यात काही चुकीचे आहे, हे त्याला कळतच नाही. (Photo: Pexels)
-
दरम्यान या संभाषणाचे व्हिडिओ रेकॉर्ड होत राहतात. यानंतर, हे सायबर चोर मुलांना ब्लॅकमेल करू लागतात आणि ते एकदाच नाही तर वारंवार करतात. ते तिला किंवा त्याला धमकी देतात की, ते हे व्हिडिओ पालक, मित्र आणि इंटरनेटवर शेअर करतील. (Photo: Pexels)
-
विकास दिव्यकिर्ती यांनी सांगितले की, याला सेक्सटॉर्शन म्हणतात. किशोरवयीन मुलांच्या जगात हे सर्वात मोठे संकट आहे. (Photo: Pexels)
-
विकास दिव्यकिर्ती म्हणतात की, आपल्यापैकी एखाद्याच्या मुलाला याचा सामना करावा लागला असेल तर ती मोठी गोष्ट नाही. मुलाने ते तुमच्यासोबत शेअर केले तर खूप छान होईल. (Photo: Pexels)
-
विकास दिव्यकिर्ती म्हणतात की, तुमच्या मुलांशी बोलायला सुरुवात करा. जर त्याच्यासोबत अशी कोणतीही घटना घडली तर त्याने त्याबद्दल तुमच्याशी बोलावे. अनेक मुलांना हे सहन होत नाही. (Photo: Pexels)
-
विकास दिव्यकिर्ती यांनी पालकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी आपल्या मुलांना समजावून सांगावे की जगात एखादी व्यक्ती कितीही विश्वासार्ह असली तरी त्याने अशी चूक करू नये. (Photo: Pexels)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case