-
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांची मे २०२५ मध्ये कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
आता कंपनीने एक्सचेंज फाइलिंगद्वारे अनंत यांना दरवर्षी किती पगार मिळेल हे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, कंपनीची HRNR समिती दरवर्षी त्यांचा पगार किती वाढवायचा हे ठरवेल.
-
एक्सचेंज फाइलिंगनुसार, अनंत अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून वार्षिक १० ते २० कोटी रुपये पगार आणि कंपनीच्या नफ्यावरील कमिशनसह अनेक भत्ते दिले जातील.
-
पगाराव्यतिरिक्त, अनंत अंबानी यांना राहण्यासाठी घर किंवा घरभाडे भत्ता, घर देखभाल खर्च, वीज, पाणी, गॅस, फर्निचर आणि दुरुस्ती खर्च, कुटुंबासह प्रवासाचा खर्च यासारख्या गोष्टींसाठी पैसे दिले जातील.
-
एक्सचेंज फाइलिंगमध्ये असेही म्हटले आहे की, कंपनी रिलायन्सच्या सर्व कार्यकारी संचालकांना दरवर्षी त्यांच्या निव्वळ नफ्याच्या फक्त १% पगार आणि भत्ते म्हणून देऊ शकते.
-
अनंत अंबानी यांचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. त्यांनी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
-
शालेय शिक्षणानंतर अनंत अंबानी यांनी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली.
-
रिलायन्सच्या उत्तराधिकार योजनेचा भाग म्हणून, अंबानींच्या तीन मुलांना (आकाश, ईशा आणि अनंत) वेगवेगळ्या व्यवसाय युनिट्सची जबाबदारी देण्यात आली आहे.
-
आकाश अंबानींबद्दल बोलायचे झाले तर, ते जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आहेत. ईशा अंबानी रिलायन्स रिटेल आणि ई-कॉमर्सची जबाबदारी सांभाळतात. तर, अनंत अंबानी ऊर्जा आणि रसायन व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. (सर्व फोटो सौजन्य: पीटीआय)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान