-
शिवसेनेच्या नेत्या (ठाकरे) अयोध्या पोळ यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये त्यांनी राज्याचे मंत्री संजय राठोड यांना चपेलेने मारण्याची भाषा वापरली आहे.
-
अयोध्या पोळ यांचे संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याबरोबर फोनवरील संभाषण सध्या व्हायरल होत आहे. या संभाषणादरम्यान समोरच्या व्यक्तीने अयोध्या पोळ यांनी लिहिलेल्या पोस्टवर आक्षेप घेतला.
-
अयोध्या पोळ पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर संजय राठोड यांचा वारकरी वेषातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी संजय राठोड यांच्यावर आरोप करत आक्षेपार्ह विधान केले होते.
-
या पोस्टचा जाब विचारण्यासाठी सदर कार्यकर्त्याने अयोध्या पोळ यांना फोन केला आणि सदर पोस्ट डिलीट करून माफी मागण्याची मागणी केली.
-
यावर अयोध्या पोळ यांनी संजय राठोड सारख्या माणसाला चपलेने मारायला हवं, असं विधान केलं. तसंच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याबद्दल असंच विधान केलेलं होतं, याचीही त्यांनी आठवम करून दिली.
-
सदर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अयोध्या पोळ यांच्यावर शिवसेना (शिंदे) पक्षाकडून टीका केली जात आहे. तर अयोध्या पोळ यांनी व्हायरल क्लिप माझीच असल्याचे मान्य केले.
-
संजय राठोड यांच्या जागी जर माझा भाऊ असता आणि त्याच्याकडून जर एखाद्या मुलीबाबत चुकीचं काही घडलं असतं तरी मी हीच भूमिका घेतली असती. माझ्या भावालाही भरचौकात शिक्षा दिली असती.
-
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात जे पुरावे समोर आणले होते, त्याच पुराव्यांचा संदर्भ देऊन मी पुन्हा एकदा सांगते की, दोन निष्पाप जीव गेल्यामुळे संजय राठोड यांना चपलेने मारायला हवे.
-
संजय राठोड यांच्यावर आरोप केल्यामुळे बंजारा समाज नाराज झाला, असा आरोप होत असताना अयोध्या पोळ यांनी यालाही उत्तर दिले. त्या म्हणाल्या, संजय राठोड यांनी स्वजातीय अधिकाऱ्याचाही छळ केला आहे.
-
संजय राठोड यांनी नवी मुंबईतील जमीन समाजाच्या नावावर हडप करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप अयोध्या पोळ यांनी केला. तसेच संजय राठोड यांच्या समाजातीलच अनेक तरूण मृत तरूणीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान