-
Uddhav Thackeray-Raj Thackeray Vijayi Sabha Updates: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी (Shivsena) शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. (Express Photo by Amit Chakravarty
-
आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतानी दूर केला, असे विधान उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला केले.
-
आम्ही हिंदुत्व सोडलं, अशी टीका केली जाते. पण आम्ही मराठी बोलणारे हिंदू आहोत. आमच्याएवढा धर्माभिमानी, कडवट हिंदू दुसरा कुणी नाही. १९९२ च्या दंगलीत हा कडवटपणा आम्ही दाखवून दिला होता.
-
भाजपाकडून एक विधान, एक प्रधान.. असे सांगितले जायचे. नंतर एक देश, एक इलेक्शन ही टूम काढली.
-
आता त्यांच्याकडून ‘हिंदी, हिंदू, हिंदूस्तान’ अशी घोषणा दिली जात आहे. हिंदू, हिंदूस्तान आम्हाला मान्य आहे. पण हिंदी आम्ही माननार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
-
संकट आल्यानंतर मराठी माणूस एकत्र येतो. पण संकट गेल्यानंतर मराठी माणूस एकमेकांत भांडतो. आता हा नतद्रष्टपणा आपण करायाचा नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
भाजपाकडून फोडा आणि राज्य करा, अशी निती वापरली जाते. महाराष्ट्रातही बटेंगे तो कटेंगी ही नीती वापरून समाजा-समाजाला वेगळे केले. मराठी माणूस एकमेकांमध्ये भांडत राहिला. आपण त्यांच्या पालख्या वाहिल्या. आपण फक्त पालखीचे भोई होणार की मायमराठीला पालखीत बसवणार? असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
कुणाच्याही लग्नात भाजपावाल्यांना बोलावू नका. येतील जेवण करतील आणि नवरा-बायकोत भांडण लावून जातील. नाहीतर नवरीला पळवून नेतील. भाजपाचे हेच उद्योग आहेत. भाजपाचे स्वतःचे काहीही नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
एक गद्दार काल जय गुजरात बोलला. त्या पुष्पा चित्रपटातला दाढीवाला झुकेगा नही साला म्हणाला. पण हा दाढीवाला उठेगा नही साला म्हणतो. काहीही झालं तरी उठेगा नही, असं म्हणतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.
-
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्या प्रकारे मराठी माणसाची एकजूट झाली होती, त्याप्रकारची एकजूट आता मराठी माणसांनी करावी.
-
अगदी भाजपामधील मराठी माणसानेही एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
-
ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर, मराठा-मराठेतर, घाटी-कोकणी हा सर्व वाद बाजूला ठेवून एकत्र या, असे आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. तेच आज पुन्हा करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंसमोरच उद्धव ठाकरेंनी दिले युतीचे संकेत; म्हणाले, “आम्ही एकत्र आलोय…”