-

सोमवारी सायंकाळी ६:५२ वाजता जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्र. १ बाहेर कार स्फोट झाला. या दुर्घटनेत १३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जखमी झाले.
-
स्फोटाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर होते. देशाबाहेर असूनही त्यांनी तातडीने घटनेची दखल घेतली आणि आपल्या भाषणात दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.
-
पंतप्रधान मोदींनी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि आवश्यक निर्देश दिले.
-
दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तातडीने दिल्लीतील LNJP (लोकनायक जयप्रकाश नारायण) हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी जखमी नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. (फोटो सौजन्य : नरेंद्र मोदी/ एक्स)
-
हॉस्पिटल भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी “Went to LNJP Hospital and met those injured… Praying for everyone’s quick recovery,” अशा शब्दांत जखमींना भावनिक आधार दिला. (फोटो सौजन्य : नरेंद्र मोदी/ एक्स)
-
या हल्ल्यामागे असलेल्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी दिला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “Those behind the conspiracy will be brought to justice!” (फोटो सौजन्य : नरेंद्र मोदी/ एक्स)
-
पंतप्रधानांनी तपास यंत्रणांना या स्फोटाच्या कटाच्या मुळापर्यंत जाऊन सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. (फोटो सौजन्य : नरेंद्र मोदी/ एक्स)
भूतान दौऱ्याहून परतल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी घेतली लाल किल्ला स्फोटातील जखमींची भेट
Delhi Red Fort Blast Updates : भूतान दौऱ्यावर असतानाच घटनेची दखल घेत पंतप्रधान मोदींचा शोकप्रकट; दिल्लीत परतल्यानंतर जखमींची भेट घेऊन तपासाला वेग देण्याचे निर्देश
Web Title: Red fort delhi blast pm narendra modi visits injured at hospital vows strict action against culprits svk 05