-

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ चे निकाल आज जाहीर होणार असून, राज्याचं नेतृत्व कोण करणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार याचा निर्णयही आज लागणार आहे.
-
बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार याची स्पष्टता मतमोजणी झाल्यानंतरच मिळेल, पण तुम्हाला माहिती आहे का की बिहारच्या मुख्यमंत्र्यांना किती वेतन मिळतं? (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
सध्या बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना दरमहा २.१५ लाख रुपये मानधन मिळतं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
भारताच्या प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्यांचे वेतन वेगळं असतं आणि त्यासाठी एकसारखी रक्कम निश्चित केलेली नाही. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
बिहार सीएमच्या पगार संरचनेत बेसिक पेबरोबरच एचआरए आणि इतर भत्त्यांचाही समावेश केला जातो. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
मुख्यमंत्र्यांच्या सेवेत आलिशान गाडी, सरकारी निवासस्थान व तेथे काम करणारा कर्मचारी वर्ग दिला जातो, तसेच घरातील टेलिफोन आणि इंटरनेटचा खर्चही सरकारकडूनच केला जातो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मुख्यमंत्र्यांना देशभर प्रवासासाठी मोफत सुविधा उपलब्ध असतात आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला विनामूल्य वैद्यकीय सुविधादेखील दिल्या जातात. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
सीएमची सुरक्षा अत्यंत उच्च स्तराची असते आणि त्यांना सामान्यतः ‘Z’ किंवा ‘Z+’ श्रेणीची सुरक्षा पुरवली जाते. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांना सीएम हाऊस सोडावे लागते, मात्र माजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यकाळानुसार पेन्शन आणि इतर काही सोयी-सुविधा देण्याचंही नियमन आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Bihar New CM : कोण होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री? सर्वोच्च पदावर असणाऱ्या नेत्याला पगारासोबत मिळतात ‘या’ विशेष सोयी-सुविधा!
Bihar Assembly Election Results 2025 : राज्याच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्याला मिळतात पगारासोबत अनेक विशेष सोयी-सुविधांचे मोठे पॅकेज
Web Title: Bihar assembly election result 2025 who will be cm and how much salary does bihar chief minister get svk 05